mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शार्प शूटरचा नेम चुकला, तीन वेळा फायरिंग करूनही बिबट्या पुन्हा निसटला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 12, 2020
in सोलापूर
धक्कादायक! सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महीलेचे शीर धडापासून वेगळे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्याचा मुक्काम सध्या वांगी परिसरात आहे. या नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाच्या शार्प शूटरनी फायरिंग करूनही नेम चुकल्याने बिटरगाव येथून पुन्हा एकदा बिबट्या निसटला आहे.

यापूर्वी चिखलठाण परिसरातील उसात लपलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पाच एकर ऊस पेटवून देण्यात आला होता. तसेच, चारही बाजूंनी शार्प शूटर तैनात करुनही बिबट्या वन अधिकाऱ्यांसमोरून पळाला होता.

आता नेम चुकल्याने तो पुन्हा निसटला आहे, त्यामुळे शार्पशूटर पाचारण करूनही बिबट्या एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा सुटतोच कसा? असा प्रश्न संपूर्ण तालुक्याला पडला आहे.

नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश मिळूनही बिबट्याला शार्पशूटरचा नेम का लागत नाही?

याविषयी तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

यापूर्वी चिखलठाण येथे ७ डिसेंबर रोजी बिबट्याला मारण्यसाठी ऊस पेटवून देण्यात आला होता. त्या उसाच्या चारही बाजूंनी शार्पशूटर लावण्यात आले होते, तरीही वन अधिकाऱ्यांसमोरून बिबट्या पळाला होता.

त्यानंतर सांगवी नं. २ येथे गुरुवारी (ता. १० डिसेंबर) मनीषा पाटील या महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्या कशाबशा बचावल्या. आतापर्यंत या नरभक्षक बिबट्याने नगर, बीड व सोलापूर जिल्ह्यातील १२ जणांचा बळी घेतला आहे. त्यात करमाळा तालुक्यात ६ दिवसांत ३ बळी घेतले आहेत.

करमाळा तालुक्यात वन विभागाचे २०० कर्मचारी तैनात असताना गेली १० दिवसांपासून वन विभागाला बिबट्या जेरबंद करता आला नाही. विशेष म्हणजे या नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बिबट्याचा प्रवास सांगवी-नरसोबाचीवाडी ते वांगी नंबर-४, ढोकरी असा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता परप्रांतीय मच्छिमारांना बिबट्या दिसला होता. परंतु त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही.

शुक्रवारी (ता.11) पहाटे पाचपर्यंत वनविभागाची यंत्रणा वांगी नं.४ वरून बिबट्याचा माग काढत दुपारी चारपर्यंत बिटरगाव शिवारात पोचली.

बिटरगाव येथील विठ्ठल रोडगे यांच्या शेतात बिबट्या दबा धरून बसलेला असताना वन विभागाच्या शार्प शूटरने त्याच्यावर तीन वेळा फायरिंग केली.

परंतु नेम चुकल्याने त्याला चकवा देऊन निसटून जाण्यात बिबट्या पुन्हा यशस्वी झाला. बिबट्या बोरकर व नलवडे यांच्या शेतातून उसाच्या फडात गेला.

वनविभागाची यंत्रणा ड्रोन, वाघर, डाॅग पथक यांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहे. बिबट्या निर्देशनास येऊनही त्याला मारले जात नाही की खरोखरच तो चकवा देत आहे, या विषयी नागरिकांच्या मनात संभ्रम आहे.

बिबट्याचा प्रवास हा नगर-बीड -करमाळातील उजनी धरणाच्या पाण्याच्या जवळपर्यंत झाला असून आता पुढे जाणे शक्य नसल्याने पुन्हा तालुक्यातील वांगीच्या दिशेने माघारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

बिबट्याच्या शोधासाठीची यंत्रणा

प्रशासकीय पातळीवरून २१ पिंजरे, ३ ड्रोन कॅमेरे, ४२ ट्रप कॅमेरे, ५ शार्पशूटर, बेशुद्ध करणारी २ पथके, १ डाॅग स्वाॅड आणि वन विभागाची १६ पथके, राज्य राखीव दलाची एक तुकडी आणि ग्रामस्थ बिबट्याच्या शोधात आहेत.

बिटरगाव येथे वन विभागाने बिबट्यावर फायरिंग केली. मात्र, बिबट्या पुन्हा निसटला. खरंच वनविभागाला बिबट्याला मारायचा आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समोर दिसूनही बिबट्याला गोळ्या का घातल्या जात नाहीत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अजून किती लोकांचे जीव जाण्याची हे वाट बघत आहेत.(सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: करमाळाबिबट्यासोलापूर

संबंधित बातम्या

मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
Next Post
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात गुरुजींनी थोपटले दंड

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

March 31, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा