टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवसेना नेते तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल पुण्यातील मोदी बागेत जाऊन भेट घेतली आहे.
अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनिल सावंतांनी पवारांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. पवारांच्या भेटीनंतर सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, अनिल सावंत व शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड झालेली चर्चा आता समोर आली आहे. कामाला लागा असा आदेश पवारांनी दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
माढ्यातील सावंत परिवाराचा भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे आहे. या कारखान्याच्या माध्यमातून अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांत कार्यरत आहेत.
याशिवाय स्वतः अनिल सावंत हे पंढरपूर शहरात राहायला असतात, त्यामुळे विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमांतून ते कायम जनतेच्या संपर्कात असतात, त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे भूम परंडा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांचे बंधू शिवाजीराव सावंत हे माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. आता त्यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पंढरपुरातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. आता त्यात अनिल सावंत यांचीही भर पडली आहे. त्यामुळे विधानसभेला पंढरपूरमध्ये चुरस वाढली आहे.
‘ही भेट विधानसभेची तयारी, असं तुम्ही समजू शकता’
शरद पवारांच्या भेटीसंदर्भात अनिल सावंत म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. भैरवनाथ शुगर फॅक्टरीसंदर्भात मी शरद पवार यांना भेटलो आहे. मी आज पहिल्यांदाच शरद पवारांना भेटलो आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे ही भेट विधानसभेची तयारी आहे, असं तुम्ही समजू शकता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज