मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका सांगोला रोड येथील कट्टे कृषी उद्योग समूह शेजारी नव्याने स्थापन होणाऱ्या सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा (sajag mahila nagari bigarsheti patsanstha)
उद्या दि.19 जानेवारी रोजी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे आधारस्तंभ संजय कट्टे यांनी दिली आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे असणार आहेत.
यावेळी आमदार समाधान आवताडे, धनश्री परीवार प्रमुख शिवाजीराव काळुंगे, विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा. चेअरमन बबनराव आवताडे,
विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, जिल्हा निबंधक किरण गायकवाड, सह.निबंधक प्रमोद दुरगुडे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, दामाजीचे माजी संचालक रामकृष्ण नागणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई शिवपुरे, तालुकाध्यक्षा संगीता कट्टे, सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरुटे आदीजन उपस्थित राहणार आहेत.
उद्या होणाऱ्या सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन सौ.माधुरी संजय कट्टे-पाटील, व्हा.चेअरमन सौ.रंजना विठ्ठलराव आसबे व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
सोनेतारण कर्ज
सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वांना सोने तारण कर्ज 12.50 टक्के या माफक दरात दिले जाणार आहे.
दामदुप्पट ठेव योजना
नागरिकांना सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये 6 वर्ष 6 महिन्यात या अत्यंत अल्पकाळात दामदुप्पट रक्कम मिळणार आहे.
ठेवींवर आकर्षक व्याजदर
नागरिकांना 46 दिवस ते 179 दिवसाच्या ठेवींवर 9 टक्के इतके व्याजदर दिले जाणार आहे तर 180 दिवस ते 364 दिवसांत 10 टक्के तर 1 वर्षाच्या पुढे 11 टक्के व्याजदर दिले जाणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे.
कन्यारत्न ठेव योजना
आपल्या मुलींच्या भविष्यासाठी 1 लाख रुपये भरा व 18 वर्षानंतर 7 लाख रुपये नागरिकांना मिळणार आहेत.
मासिक प्राप्ती ठेव योजना
1 लाख रुपये 15 महिन्यांसाठी ठेवा व प्रतिमाहिना 1000 रुपये मिळवा ही आकर्षक योजना सुरू करण्यात आली आहे.
सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जाणार आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली जाणार आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा, व्यावसायिक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज