mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट ; शरद पवार मोहिते पाटलांना हिसका दाखवणार ?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट ; शरद पवार मोहिते पाटलांना हिसका दाखवणार ?

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. मात्र पक्षातून बाहेर पडलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना हिसका दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नवा डाव टाकणार का, याची चर्चा रंगू लागली आहे.

डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी द्या, अशा आशयाचे पत्र माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे.

डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. यासाठी तरुण, उच्चविद्याविभूषित डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना विधानपरिषद निवडणुकांमध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांची नेमणूक व्हावी, अशी विनंती आमदार शिंदे यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर मोहिते-पाटील गटाने रणजीतसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. पण त्यावेळी शरद पवारांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर उद्या ते संघाच्या चड्डीत दिसणार का ? अशी टीका केली होती. त्याला जयसिंह मोहिते -पाटील यांनी कुस्ती खेळणारा पैलवान लंगोट लावून असतो, मैदान सोडून जात नाही (पवारांची माढा लोकसभा निवडणुकीतून माघार ) असे म्हणत उत्तर दिले होते.

त्यामुळे लोकसभेतील राष्ट्रवादीच्या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी आणि जिल्हात पक्षाला बळकट करण्यासाठी शरद पवार हे सोलापूरमधून तगडा उमेदवार देणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभव पत्करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर बलाढ्य अशा भारतीय जनता पार्टीचे तगडे आव्हान उभे होते. परंतु डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी झंझावती प्रचार दौरा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना मोलाची साथ दिली होती. याचबरोबर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विजयात डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांचा मोठा वाटा आहे. (News18 Lokmat)

—————————-

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapurराजकीय

संबंधित बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

‘पती अन्‌ मुलाची मदत न घेता….’ नगरपालिकेचा कारभार यशस्वी करून दाखवणार; नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सुनंदा आवताडेंची मोठी घोषणा

January 6, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! सरपंच व उपसरपंचाने स्वतःचे  मानधन दिले गावाच्या विकासासाठी; मंगळवेढ्यातील ‘या’ गावातील दोघांची सामाजिक बांधिलकी

December 29, 2025
जोडीनं अंबाबाईचं दर्शन! आर्चीशी लग्न करणार का? कृष्णराज महाडिक यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले ठरवून…

फॉर्म्युला वन रेसिंग,’ आर्ची’शी लग्नाची चर्चा अन् आता कृष्णाराज ‘या’ निवडणुकीच्या रिंगणात; महाडिकांची तिसरी पिढी मैदानात

December 29, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागणार; ‘या’ नावांची चर्चा सुरू; कोणाला संधी मिळणार?

December 23, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे; कारभारावेळी येणार अडचणी; पाच वर्षे संघर्ष बघावा लागणार; उपनगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा असेल तर…?

December 22, 2025
मंगळवेढा नगरपालिकेवर भाजप उमेदवार सुजाता जगताप व सर्व नगरसेवकांना निवडून द्या, महिलांच्या विकासासाठी एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही; लाडक्या बहिणींना आमदार चित्रा वाघ यांचे आवाहन

मंगळवेढा नगरपालिकेवर भाजप उमेदवार सुजाता जगताप व सर्व नगरसेवकांना निवडून द्या, महिलांच्या विकासासाठी एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही; लाडक्या बहिणींना आमदार चित्रा वाघ यांचे आवाहन

December 17, 2025
Next Post
BREAKING I पोलीस दलात कोरोनाची धडक ; सोलापुरातील नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

BREAKING I पोलीस दलात कोरोनाची धडक ; सोलापुरातील नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

‘पती अन्‌ मुलाची मदत न घेता….’ नगरपालिकेचा कारभार यशस्वी करून दाखवणार; नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सुनंदा आवताडेंची मोठी घोषणा

January 6, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बनावट सोन्याचे दागिणे देवुन 10 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपीस जामीन मंजूर; केवळ संशयित म्हणून.., मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 6, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

January 6, 2026
धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

January 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..