टीम मंगळवेढा टाईम्स ।
चार जुलै रोजी सोलापुरात काढण्यात येणाऱ्या मराठा संघर्ष मोर्चाच्या तयारीसाठी सोमवारी येथील मंगळवेढ्यात व पंढरपुरात बैठकीची सुरुवात झाली.
सोलापुरात काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी येथील संत दामाजी मंदिरात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार हे हॉटेलवाल्यांचे प्रश्न सोडू शकतात पण मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर इतके उदासीन का ? असा सवाल त्यांनी केला.
मागील वेळी सर्व समाजाने एकत्रित येऊन आंदोलन केले. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सोयीस्कररीत्या आंदोलनास बगल दिली आहे असा आरोप पाटील यांनी केला.
तसेच आंदोलनास राजकीय वास येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. समाजाला एकत्र करून आमची सरकार विरोधातील आरक्षणासाठीची लढाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ मतांसाठी मराठ्यांचा वापर :
राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख मराठ्यांचा पक्ष म्हणून आहे. सर्वाधिक आमदार खासदार हे मराठा समाजाचे आहेत.
मराठ्यांचा वापर फक्त मतदानाकरता करायचा का ? त्यांच्या मुलांना यूपीएससी , एमपीएससीसाठी शिकवायचे आहे , हे आता मराठा समाजाने ठरवावे असेही पाटील यांनी म्हटले.
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे , यासाठी १ ९ ८० पासून अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर राजकारणविरहित ५८ मूक मोर्चे निघाले तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. आता मी भाजपमध्ये आहे . त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाचे काही कार्यकर्ते मराठा आरक्षणप्रश्नी बैठकीस उपस्थित राहात नाहीत . त्यांनी या प्रश्नात राजकारण आणू नये , असे आवाहन माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले , आंदोलनात अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन परिस्थितीत टोकाची भूमिका घेतली होती . त्याचे कारण तेव्हाचे मराठा समाजातील राज्यकर्ते होते . तेव्हा आरक्षण दिले असते तर आज ही वेळ आली नसती. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने नवीन मागासवर्गीय आयोग तयार केला.
आ.आवताडे मोर्चासाठी वाहने व बॅनरचा खर्च करणार
या आयोगात मराठाद्वेषी सदस्य आहेत , मग आरक्षण कसे मिळणार ? आमदार समाधान आवताडे म्हणाले , सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष आहे. या लढ्यात राज्य व केंद्र सरकार म्हणत बसण्यापेक्षा आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. या मोर्चासाठी वाहने , बॅनरचा आपण खर्च करू.
यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ वाकडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांच्यासह मराठा व इतर समाजाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज