टीम मंगळवेढा टाईम्स । काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत.काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. Sharad Pawar should be made Congress President- Ramdas Athavale
काँग्रेस हा या देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता १०० खासदार ही निवडून आणू शकत नाही. दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेस चे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे.याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनीघ्यावा.@PawarSpeaks@RahulGandhi
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 5, 2020
अशा परिस्थितीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस मध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे. माझ्या या सूचनेबाबतचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा,असेही आठवले पुढे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी गांधी घराण्यातील व्यक्तीऐवजी इतर नेत्यांकडे काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवण्यात यावं हा विचारही पुढे आला होता. खुद्द सोनिया गांधी यांनीही या विचाराला आपलं समर्थन देत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र अद्याप यावर कोणातही अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनाच अध्यक्षपद द्यावं अशी मागणी केली होती, परंतू त्यावरही अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलाची गरज असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केले होते.
पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी या नेत्यांनी पत्रातून केली होती. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क: 7322020202
Sharad Pawar should be made Congress President- Ramdas Athavale
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज