टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटापाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरु आहे.
अशातच शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल याची अप्रत्यक्षपणे घोषणा केली आहे. शरद पवार यांनी अका बड्या नेत्याचे नाव जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी मोठं विधान केलंय.. जयंत पाटील यांनी उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी असं विधान शरद पवार यांनी केलंय..
दरम्यान, या विधानामुळे महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात असली तरी यासंदर्भात काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केली गेली नाही.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगलीतल्या सांगता सभेत शरद पवार बोलत होते. उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि प्रगती घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे असं शरद पवारांनी सांगलीच्या सभेत जाहीर केलंय. त्यामुळे जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत का याची चर्चा आता सुरु झालीय..
सांगलीतल्या शिवस्वराज्य सांगता सभेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री अशी घोषणाबाजी केली.. मात्र त्यावरुन जयंत पाटील यांनीही मिश्किल टोलेबाजी केली.. घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही तर त्याला खूप उठाबशा काढाव्या लागतात असा टोला जयंत पाटील यांनी लगावला..
उठा उठा निवडणूक आली आता गद्दारांना गाडण्याची पवार वेळ आली असं आवाहन अमोल कोल्हेंनी शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत केलंय… त्याचसोबत मुख्यमंत्रिपदाबाबतही अमोल कोल्हेंनी सूचक विधान केलंय. वाळव्याचा माणूस वर्षावर जायची इच्छा आहे असं म्हणत अमोल कोल्हेंनी जयंत पाटील यांच्याबाबत सूचक विधान केलंय.
जयंत पाटील यांना मोठी संधी
शरद पवारांकड़ून मविआची सत्ता आल्यास जयंत पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हाती महाराष्ट्राची उभारण्याची सावरण्याची महाराष्ट्र पुढं नेण्याची जबाबजदारी टाकणार आहे.
महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. शिवछत्रपती यात्रा करण्याची नोंद महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.
शरद पवारांकडून जयंत पाटलांच्या सीएम पदाचे संकेत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व सहमतीने जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते की काय हे अवघ्या दीड महिन्यात स्पष्ट होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज