मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सोलापूर जिल्हा महिला संघटकपदी शैला गोडसे यांची निवड करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात जिल्हा संपर्कप्रमुख व माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. तानाजीसावंत यांची निवड केली नाही याचे दुःख झाले आहे. गोरगरिबांना, शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाकडे बघितले जाते.शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता
तसेच दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये रोखठोक व धाडसी नेतृत्व असलेले डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षापासून शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून मी जबाबदारी पार पाडीत असल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हंटले होते.
परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार परत शैला गोडसे यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, बार्शी, माढा व माळशिरस या कार्यक्षेत्रात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज