मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क।
एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने तिला तिच्या पालकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथील नामदेव पायरीसमोर सोडून गेले. ही घटना ५ डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे.
मंदिर सुरक्षा कर्मचारी श्रीधर अशोक कुलकर्णी यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील नामदेव पायरीसमोर एक अनोळखी मुलगी वय अंदाजे 7 वर्ष मिळून आल्याने त्यांनी तीस पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे हजर केले होते.
पोलिसांनी मंदिर परिसरात त्या बालिकेच्या नातेवाइकांबद्दल विचारपूस केली; परंतु कोणीही काहीही माहिती सांगितली नाही. त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समितीच्या अध्यक्षा कोकरे व सय्यद यांना फोनद्वारे अनोळखी मुलीची माहीती दिली.
त्यांच्या सूचनेने पोलिसांनी अनोळखी मुलीस पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रम येथे जमा केले. त्या मुलीस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बालकल्याण समिती सोलापूर यांच्या समक्ष दाखल केले. त्यानंतर तिचे आई-वडील व नातेवाईक यांचा पंढरपूर शहरात शोध घेतला असता तिचे आई-वडील व नातेवाईक अद्यापर्यंत मिळून आलेले नाहीत.
अनोळखी मुलगी वय ७ हिला तिचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथील नामदेव पायरीसमोर कोणीतरी अज्ञात पालक सोडून गेलेले आहेत, अशी फिर्याद शहर पोलिस ठाण्यात पोहेकों स्वाती लोंढे यांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज