मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पंढरपूर शहर आणि तालुक्यात आज सात नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता पंढरपूरची नव्याने संख्या २० वर गेलीय.
पंढरपूरात एक पोलिस कर्मचारी आणि त्याच्या संपर्कातील पाटकळ तालुका मंगळवेढा येथून पंढरपूरला आलेला एक व्यक्ती असे दोन नवे रुग्ण सापडले. तर कोरोना बाधित एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष , वकिलाच्या संपर्कातील येळे वस्ती येथे एक तर लिंक रोड परिसरात दोन असे पाच रुग्ण सापडले आहेत.
यातील तीनही रुग्णांना घेवून वकील दौंड येथे हॉस्पिटलमध्ये गेल्याचे समजते. तर ग्रामीण भागात खर्डी गावात वाकी शिवणे तालुका सांगोला येथून आलेली महिला पॉझिटिव्ह निघालीय. तर करकंब एक असे रुग्ण सापडले आहेत.
पंढरपूर शहरात कोरोनाचा शिरकाव आता वाढत जात असल्याचे चित्र दिसत आहे. आज सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॉब घेणे सुरु झाले आहे. तर नव्याने सापडलेल्या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे.
Seven new corona positive, patients in Pandharpur, mangalwedha taluka pathakhal one positive patient
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज