टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर असताना टेंभू म्हैसाळ योजनेसाठी उर्वरित पाणी वितरणाबाबत हुन्नूर येथे पाणी परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे अयोजन राष्ट्रवादीचे नेते, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील ३५ गावांचा ज्वलंत प्रश्न तत्कालीन स्व. आमदार भारत भालके नाना नेहमीच मांडायचे. या योजनेसाठी पाणी साठा परवाना कमी असल्याने महाविकास आघाडी सरकार काळात अतिरिक्त 1 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले.
तसेच जत कालवा मंगळवेढा वितरीका १ व अन्य वितरिकांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील ६००० हेक्टर क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे हि तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत असताना मागील २.५ वर्षाच्या काळात या योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी सरकारने मागील १ वर्षाच्या काळात कोणतेही ठोस काम या योजनेसाठी केले नसल्याचे प्रामुख्याने दिसून येते.
सध्या राज्यातील पावसाची परिस्तिथी पाहता या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून देखील सरकारला जाग येत नाही. इथला शेतकरी हवालदिल झालेला असताना देखील सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.
सध्याचे सरकार पालकमंत्री पद वाटपामध्येच अडकुन पडले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, निरिक्षक शेखर माने, राहूल शहा,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राहुल शहा, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष मुझमिल काझी,
नगरसेवक विजयकुमार खवतोडे, माऊली कोंडूभैरी, जमीर इनामदार, माणिक गुंगे, अमित मम्हाणे, अण्णा शिरसाट, अशोक रणदिवे, प्रदीप खरतोडे, नागेश फाटे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, गणेश पाटील तसेच पंचक्रोशीतील अनेक शेतकरी मंडळी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज