टीम मंगळवेढा टाईम्स । महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने संशोधित केलेल्या ‘फुले विक्रम’ हरभरा या वाणाच्या लागवडीसाठी बियाणे आता मंगळवेढ्यात मिळणार असल्याची माहिती प्रभाकर रत्नपारखी यांनी दिली आहे.
कंबाइन हार्वेस्टरने काढणी करता येणारा वाण असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असल्याचे कृषी विद्यापीठाने स्पष्ट केले आहे . त्यानंतर देशाच्या मध्य विभागासाठी (महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात) ‘फुले विक्रम’ हा वाण प्रसारित करण्यात आला आहे.
हा वाण विकसित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा तसेच संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन सुरू होते.
दहा वर्षांच्या संशोधनानंतर संशोधित केलेला हा देशातील तिसरा व राज्यातील पहिलाच वाण आहे.
‘फुले विक्रम हरभरा’ वाणाची वैशिष्ट्ये
जमिनीपासून दोन फूट उंच वाढणारा, एक फुटावर घाटे लागतात.
उंच असल्याने कंबाइन हार्वेस्टरने पिकाचे कुठलेही नुकसान न होता व्यवस्थित काढणी करता येते.
मर रोगाला प्रतिकार करणारा. पिवळसर मध्यम आकाराचे दाणे लागतात.
उत्पादन क्षमता ४०-४२ क्विंटल प्रतिहेक्टर व सरासरी उत्पादन २२ क्विंटल प्रतिहेक्टर मिळते.
बागायतीसह जिरायती भागालाही फायद्याचा वाण आहे.
उशिराने लागवड केली, तरीही उत्पादनात फरक पडत नाही.
यांत्रिक पद्धतीने काढता येत असल्याने पीक काढणीवरील खर्चात बचत होते.
या बियाणांचा मोजकाच स्टोक शिल्लक असून ज्यांना लागवडीसाठी बियाणे हवे असल्यास त्यांनी 96 65 69 59 70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रभाकर रत्नपारखी यांनी केले आहे.
The seeds of ‘Phule Vikram’ variety of gram will now be available on mangalwedha
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज