टीम मंगळवेढा टाईम्स ।
T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन T20 सामन्यांची मालिका खेळत आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
तर दुसरा टी-20 सामना नागपूरच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 91 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 4 चेंडू राखून 6 विकेट्स राखून सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 46 धावा केल्या. 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली.
कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीच्या षटकांमध्ये षटकार ठोकत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. भारताची पहिली विकेट तिसऱ्या षटकात केएल राहुलच्या रुपाने आली. राहुल 6 चेंडूत 10 धावा करुन बाद झाला. विराट कोहली 6 चेंडूत 11 धावा करुन बाद झाला.
दुसरीकडे, नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी गमावून 90 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने 43 धावा केल्या. कर्णधार अॅरॉन फिंचने 31 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने दोन बळी घेतले.
तसेच, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्याच षटकात कॅमेरुन ग्रीनच्या रुपाने पहिला धक्का बसला. 5 धावा करुन तो धावबाद झाला.
त्यानंतर अक्षर पटेलने पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. पुढच्या षटकात टीम डेव्हिडही क्लीन बोल्ड झाला. मात्र, मॅथ्यू वेडने धडाकेबाज फलंदाजी करत 20 चेंडूत 43 धावा केल्या.
रोहितच्या झंझावातात ऑस्ट्रेलियाने धुमाकूळ घातला
नागपुरात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
पावसामुळे हा सामना 8-8 षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या आणि भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात टीम इंडियाने 7.2 षटकांत 92 धावा केल्या आणि सामना 6 विकेटने जिंकला. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने 46 धावा केल्या. रोहित शर्माने 20 चेंडूत 46 धावांची तुफानी खेळी केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज