
राजेंद्र फुगारे : मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सांगोला,मोहोळनंतर पंढरपूर तालुक्यात एका गावात रुग्ण आढळला होता.त्यानंतर पंढरपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला परिसरालगतचा एक किलोमीटरचा भाग गुरुवारी पहाटेपासून सील करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरातील व्यापारी पेठ व बाजार बंद झाला.
मुंबईहून दोन नागरिक पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरात आले होते. त्यांना एका खाजगी शिक्षण संस्थेत मध्ये संस्थात्मक करण्यात आले होते. ते दोघे संस्थात्मक कॉरंटाईन असताना त्यांचे नातेवाईक जेवण डब्बा पुरवीत होते.
ते दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरातील चारही बाजूचा एक किलोमीटर परिसरात सील करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने आंबेडकर चौक, शिवाजी चौक, अर्बन बँक चौक, सावरकर चौक व सरगम चौका मध्ये बेरीकटिंग लावली आहे. त्याचबरोबर त्या परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे.
ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीच्या आजूबाजूलाच विविध प्रकारचे दुकाने आहेत. त्याचबरोबर भाजी मंडई, किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने व शेतीची अवजारे विक्री करणारे दुकाने आहेत. या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यास निर्बंध केले आहेत. यामुळे पंढरपुरातील बाजार बंद राहणार आहे.
Seal area of kilometers in Pandharpur Bajarpeth Kelly closed
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












