मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सांगलीत पार पडलेल्या पहिल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचं पक्षाकडून रिचार्ज करण्यात आलं.
तसेच, राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या निमित्ताने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना देखील पूर्णविराम मिळाल्याचं दिसून आलं.
मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी महत्वाची घोषणाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी केली आहे. सांगलीतून ज्याची सुरुवात होईल ती गुढी भविष्यात राज्यात उभारली जाईल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे
पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी आता फोनवरुन हॅलोऐवजी जय शिवराय बोलायचं, असे म्हटले. आता येथून पुढे फोन लावल्यावर जय शिवराय बोलायचं, सुरुवात सांगलीतून होईल हा प्रांताध्यक्षांचा आदेश आहे, असेही शिंदे यांनी म्हटले.
जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादी पार पडला मेळावा.
या मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. कोणताही फोन आला तर सुरुवातीला जय शिवराय म्हणायचं, सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला आपण शाबूत ठेवला.
परंतु, दुर्दैवाने सातारामधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाभूत झाला आहे. गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले, त्यांनी हार मानली नाहीत. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असं आवाहनही शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज