टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील सतीश होनराव या शेतकऱ्याने संगोपन केलेल्या खिलार जातीच्या बैलाची संत ज्ञानेश्वर माऊली आषाढी पालखी सोहळ्यातील रथाच्या सारथ करण्यासाठी मागणी केल्यानंतर विक्रमी 6 लाख 11 हजारास सागर टिळेकर (रा.धायरी पुणे) याने खरेदी केला.
यावेळी आ.समाधान आवताडे,माजी सभापती प्रदीप खांडेकर,स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संघटक विजय रणदिवे,रामचंद्र होनराव,आण्णासो होनराव,शंकर संघशेट्टी,इरगोंडा पाटील,आदी उपस्थित होते.
तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे प्रभावी साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीस पुरक दुध व्यवसाय निवडला.त्यातून रोजगाराचे साधन निर्माण केले.
त्यामध्ये खिलार जातीच्या गाईबरोबर जरशी गायीच्या दुधाच्या विक्रीतून कौटुंबिक स्थैर्य निर्माण केले. त्यामध्ये तालुक्यातील हिवरगाव येथील सतीश होनराव या शेतकऱ्याला गाई व बैलाचे संगोपन करण्याचा छंद असून त्यासाठी त्यांनी राज्याबरोबर परराज्यात भरणाऱ्या जनावराच्या प्रदर्शन भेटी दिल्या.
त्यामध्ये घटप्रभा ता.रायबाग (गोकाक) येथील जनावराच्या प्रदर्शनातून खिलार जातीचा बैल पारख करून दोन लाख रू किमतीला दिड वर्षापूर्वी आणला.या बैलापासून नवीन उत्पत्ती होण्यासाठी सोलापूर,सांगली,सातारा येथून देशी गायी हिवरगाव आणल्या जात होत्या.
या खिलार जातीच्या बैलाची माहिती सोशलमिडीयातून राज्यभर गेल्यावर आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यातील रथाचे सारय्थ करण्यासाठी या बैलाची मागणी करण्यात आली.धार्मिक कार्यासाठी हा बैल जात असल्याने या बैलाची 6 लाख 11 हजाराला विक्री करण्यात आली.
शेतकऱ्यांसमोर आदर्श उदाहरण
या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून जनावरांचे संगोपन करताना पोटाला चिमटा घेऊन केले.त्यामुळे या चांगल्या दर्जाच्या जनावराला चांगली किंमत आली. मोठ्या कष्टाने जनावरांचे संगोपन केल्यामुळे जनावरांचे महती राज्यभर गेले त्यामुळे त्याला चांगला दर मिळाला.
यावरून दुष्काळी तालुक्यात देखील जनावराच्या माध्यमातून चांगली आर्थिक उलाढाल होऊ शकते हे या तालुक्यातील हिवरगाव शेतकऱ्याने दाखवून दिले.हे इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श उदाहरण ठरले : आ.समाधान आवताडे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज