मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत आलेल्या पाण्याचे पूजन पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये शिवणगी या ठिकाणी संपन्न करण्यात आले.
गेली अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या भागातील जनतेला पाणी सिंचन योजनेपूरक म्हैसाळ सिंचन मधून पाणी मिळवून देण्यासाठी आ आवताडे यांनी विविध अधिवेशनावेळी सदर उपसा सिंचन सुरु होण्यासाठी आवाज उठवून
तसेच तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन सदर पाणी या भागातील जनतेसाठी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच पंतप्रधान कृषी तंत्र योजनेतूनही या योजनेसाठी भरघोस निधी मंजूर खूप मोठी मदत झाली आहे.
आ आवताडे यांनी या उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळवून देण्यासाठी या विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांची विचारविनिमय व आढावा बैठक घेऊन ही मार्गी लवकरात – लवकर कार्यान्वित करण्यासाठी आदेशीत करुन आवश्यक सूचना केल्या होत्या.
त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने या योजनेची माहिती घेऊन योजनेसंदर्भात असणाऱ्या सर्व तांत्रिक त्रुटी दूर करुन ही योजना सुरु होण्यासाठी सहकार्य केले आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून रेवेवाडी, पडोळकरवाडी, लोणार, महमदाबाद हु., शिरनांदगी, मारोळी या गावांना वितरकेद्वारे तर चिखलगी, जंगलगी, बावची, पौट, सलगर बु., सुलगर खु.,
या गावांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाण्याची सुविधा मिळणार आहे. अकरा गावांसह सदर योजनेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या लवंगी, आसबेवाडी, येळगी, सोड्डी, शिवणगी, सलगर खु.
आणि सलगर बु या गावांचा पूर्व भाग या गावांनाही बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच या उपसा सिंचन योजनेद्वारे उर्वरित सर्व गावांनासुद्धा लवकरच पाणी मिळणार आहे.
मतदारसंघातील धोरणात्मक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी आपल्या विकासात्मक नेतृत्वाच्या माध्यमातून प्रयत्नशील असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आ आवताडे यांनी यापुढील काळामध्येही तालुक्यातील विविध पाणीप्रश्नांवर काम करुन उर्वरित पाणी मार्गी लावून
तालुक्यातील जनतेची तहान भागवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे. पाणी पूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी व नागरिकांनी आ आवताडे यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करुन आपला आनंद व्यक्त केला.
या योजनेतील पाण्यामुळे वरील गावाच्या अनेक भागातील शेती क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाखाली येणार असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त करुन आ आवताडे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर,अंबादास कुलकर्णी, दत्तात्रय जमदाडे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी संचालक विजय माने, माजी उपसभापती धनंजय पाटील,
न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव यांचेसह इतर मान्यवर व या भागातील विविध गावांचे आजी – माजी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रातील मंडळी ग्रामस्थ मंडळी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज