टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे प्रादेशिक पाणी योजना वारंवार विस्कळित होत आहे. दुसऱ्या बाजूला टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासन मंजूर करत नसल्यामुळे गावातील जनतेचा रोष अंगावर घेण्यापेक्षा सरपंचांचा राजीनामा देण्याचा इशारा शिरनांदगी येथील सरपंच मायाका थोरबोले यांनी दिला.
तालुक्याच्या दक्षिण भागात भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबवली. या योजनेचे पाणी सध्या आठ-आठ दिवस मिळत नाही. उन्हाची तीव्रता वाढत असून नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहेत. भोसे प्रादेशिक योजनेचे पाणी हे फक्त गावठाणात दिले जात आहे. मात्र वाड्या-वस्तीचा यात समावेश नाही.
शिरनांदगी तलावातील पाणी संपल्यामुळे ग्रामपंचायतीने भोसे प्रादेशिक योजनेचे पाणी मिळावे, यासाठी शिखर समिती व पाणीपुरवठा खात्याकडे वारंवार पाठपुरावा केला.
मात्र त्यांना या योजनेचे पाणी दिले नाही. वाडी-वस्तीवरील लोकांना व जनावरांना पाणी देण्यासाठी टैंकर मागणीचा प्रस्ताव सादर केला, मात्र प्रशासनातील एकही अधिकारी फिरकला नसल्यामुळे प्रशासनाच्या कागदोपत्री अंमलबजावणीबद्दल संताप व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांकडून वारंवार पाण्याची मागणी होत आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासन भोसे प्रादेशिकेचे पाणी देत नाही तर वाडी-वस्तीला टँकर देत नाही. त्यापेक्षा लोकांकडून अपशब्द ऐकून घेण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा अशी भावना व्यक्त केली.(स्रोत:सकाळ)
वाड्या-वस्त्या तहानलेल्याच
भाळवणी ग्रामपंचायतीने वाडी-वस्तीवर टँकर देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून जलजीवन योजनेद्वारे पाणी देण्याच्या सूचना देऊन देखील अद्याप वाडी-वस्तीवर लोकांना पाणीपुरवठा सुरू झाला नाही.
तर काही गावात टँकर देण्याची प्रशासनाची मानसिकता नाही. उलट कनिष्ठ कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय प्रस्ताव सादर करून येत असे सूचना दिलेल्या आहेत तर सादर केलेल्या टँकरच्या प्रस्तावामध्ये परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असेच सांगून चालढकल केली जात आहे.
अधिकाऱ्यांना सूचना दिल्या
आराखडा बैठकीतील पाणी प्रश्न गांभीर्याने घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, जलवाहिनी योजनेची गळती रोखण्यासाठी आचारसंहितेपूर्वी मागणी केलेला २९ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.- समाधान आवताडे, आमदार, पंढरपूर- मंगळवेढा
काम पूर्ण होताच पाणी दिले जाईल.
यापूर्वी या योजनेचे पाणी शिरनांदगी ग्रामपंचायतीने घेतले नाही. पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भात जलवाहिनीची १८ ठिकाणची गळती काढण्याचे काम सुरू आहे ते काम पूर्ण होताच पाणी देणे दिले जाईल. – राजकुमार पांडव, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज