mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काय झाडी, काय डोंगर! अजितदादा पवारांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये; तिरंगी लढतीची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 14, 2024
in सोलापूर
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने तसेच नेत्यांनी मोठी तयारी केली आहे. राज्यातील स्टार आमदार अशी ओळख असणारे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हेही सध्या विधानसभा तयारीला लागले असून मुंबई आणि परिसरात कामानिमित्त झालेल्या हजारो मतदारांना भेटण्यासाठी त्यांनी मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केले होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या निसटत्या विजयाला हातभार लावणारे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनीही या वेळेला निवडणूक रिंगणात उतरायची तयारी सुरू केल्याने शहाजी बापूंच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे.

यामुळेच शहाजी बापूंनी आता मतदार संघातील जगण्यासाठी बाहेर गेलेल्या मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सांगोला ही दुष्काळी नगरी अशी ओळख असल्याने येथील अनेक नागरिक जगण्यासाठी देशभर गेलेले आहेत. सोने गाळण्याचे काम करणारे काही मतदार पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ अशा विविध राज्यात गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत.

अशाच पद्धतीने मायानगरी मुंबई ,उपनगरे ,नवी मुंबई, ठाणे ,पनवेल व रायगड अशा ठिकाणी दहा हजारापेक्षा जास्त सांगोलकर पूर्वीपासून राहत आहेत. या मतदारांना साद घालून आपल्या मतदारसंघात मतदानासाठी आणण्याच्या हेतूने आज शहाजी बापू पाटील यांनी कळंबोली येथे या मतदारांचे गेट-टुगेदर व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गेलेल्या बापूंनी आज दुसऱ्या दिवशी लगेच मुंबई परिसरातील आपल्या गावाकडच्या लोकांना एकत्रित करण्याचे नियोजन केले आहे.

आजच माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे जगायला गेलेल्या सांगोल्यातील बांधवांचा स्नेह मेळावा व भोजनाचे आयोजन केले आहे. काही दिवसापूर्वी दीपक साळुंखे यांनी कलकत्त्यात जाऊन तेथे सांगोल्यातील नागरिकांना एकत्रित केले होते.

आता शहाजी बापू पाटील हे मुंबईत आज स्नेह मेळावा घेत असताना दीपक साळुंखे यांनीही पुण्यात आजच स्नेह मेळावा ठेवला आहे . सांगोल्याचे फिक्स आमदार अशी जाहिरात बाजी दीपक साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळे शहाजी बापूंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. सांगोल्याचा गड राखण्यासाठी शहाजी बापू आता जोमाने तयारी लागली असून या दोघांच्या वादावर शेकाप लक्ष ठेवून आहे.

सांगोल्यात ही सर्व मंडळी जगण्यासाठी जरी मुंबईकडे गेली असली तरी त्यांनी आपल्या मातीची नाळ तुटू दिलेली नाही. याचाच फायदा घेत मुंबई परिसरातील जवळपास दहा ते बारा हजार मतदारांचा मेळावा शहाजी बापू यांनी कळंबोलीतील न्यू सुधागड विद्यालय येथे आयोजित केला आहे.

या मेळाव्यासाठी बापूंचे समर्थक गेल्या काही दिवसापासून मुंबई परिसरात असणाऱ्या सांगोल्यातील मतदारांशी संपर्क ठेवून या मेळाव्याचे नियोजन करीत आहेत. पूर्वीचा दुष्काळी सांगोला ही ओळख पुसण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत असून या काळात मोठ्या प्रमाणात सिंचनाची व रस्त्याची कामे बापूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करून घेतली आहेत.

मुंबई त राहणाऱ्या या आपल्या मतदारांना सांगोल्यात सध्या काय विकास झाला आहे याची माहिती देऊन सांगोल्याला पुन्हा एकदा सोन्याचे करण्यासाठी आपल्या मागे उभे रहा असे आव्हान शहाजी बापू करणार आहेत.

काल संध्याकाळी सहा वाजता कळंबोलीतील या मेळाव्यात नेमके किती मतदार येणार याकडे बापूंचे लक्ष असले तरी त्यांनी या मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याचवेळी दीपक साळुंखे हे देखील पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील संगोल्याच्या नागरिकांना साद घालत आहेत.

गेल्या निवडणुकीत अतिशय निसटता विजय मिळवलेले शहाजी बापूंना आता यावेळी आपण केलेल्या विकासाच्या जोरावर निवडून यायचे असून त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे शेतकरी कामगार पक्ष याच्याशी दोन हात करताना त्यांना एक एक मताची आवश्यकता भासत आहे.

सध्या शेतकरी कामगार पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख हे दोन भाऊ उमेदवारीसाठी झगडत असून याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत.

मात्र शहाजी बापूंना गेल्या वेळी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनीही आता विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याने शहाजीबापू प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करताना दिसत आहेत.

दीपक साळुंखे यांची मोठी ताकद असून सध्या त्यांच्याकडून ठाकरे गटाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. सांगोल्यात महाविकास आघाडीचे तिकीट ठाकरे गटाला मिळाल्यास दीपक साळुंखे येथील उमेदवार असणार आहेत आणि असे झाल्यास या तिरंगी लढतीत कशा रीतीने सामोरे जायचे याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत.

महाविकास आघाडीत सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाला देण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न असला तरी सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला केवळ बार्शी ही एकमेव जागा सध्या निश्चित झाल्याचे दिसत आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्यावेळी सांगोल्याचा आमदार शिवसेनेचा असल्याने ही जागा आम्हालाच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्यात लढत झाल्याने ठाकरेंची शिवसेना व शेकाप मध्ये फारसे सख्य नाही. अशावेळी महाविकास आघाडीतून सांगोल्याची जागा शिवसेनेला घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक बनला आहे.

सध्या तरी तिरंगी लढत झाल्यास शहाजी बापूंना विजय मिळवण्यासाठी मतदारसंघातील जगण्यासाठी बाहेर गावी असलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवणे हा सर्वात चांगला पर्याय दिसत आहे. त्यामुळेच शहाजी बापू यांनी आज मुंबईत सांगोल्यातील मतदारांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

सोन्याच्या सांगोल्याची सोनेरी माणसे असे संबोधत या स्नेहबंधन मेळाव्याचे गणित बापू घालत आहेत . तर दीपक साळुंखे हे देखील शहजिबापूना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

याचा कितपत फायदा शहजिबापू व दीपक साळुंखे त्यांना होणार हे पुढील काळात निश्चित होणार असले तरी सांगोल्यात संभाव्य तिरंगी लढतीत संगोळ्याचा गड राखणे ही बापुंसाठी अग्नीपरिक्षा असेल .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार शहाजी पाटील

संबंधित बातम्या

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खबरदार! कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावू देणार नाही; पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा; संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू करा; नागरिकांची मागणी

August 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण म्हणत पत्नीला पैशासाठी चाबकाने मारहाण करत छळ; गळफास घेऊन महिलेने केली आत्महत्या

August 22, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

धाकधूक वाढली! उजनीतून भीमा नदीत ‘इतक्या’ हजार क्युसेक तर वीर धरणातून ४७ हजार क्युसेकचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

August 20, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

मोठी बातमी! पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूका ‘या’ महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या

August 20, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण भरले ‘एवढे’ टक्के; मुसळधार पावसामुळे उजनीतून दोन महिन्यात सोडले ६३ टीएमसी पाणी; धरणात दौंडवरून आवक सुरूच

August 19, 2025
Next Post
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शरद पवारांची वेगळीच खेळी; भाजपच्या उमेदवारीवर राजकीय समीकरणे अवलंबून राहणार; यांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात?

ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात आमदार समाधान आवताडे यांना बळ मिळणार;  मंत्रिमंडळाची लॉटरी लागणार? उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून राजकीय संकेत

मोठी बातमी! मराठा आरक्षण मागणीसाठी भाजप आमदार आवताडे आक्रमक; मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा; सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

August 29, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मोठी बातमी! मराठा आंदोलकांच्या जोरदार घोषणा, तरुणांना पाहून जरांगे संतापले; दिला ‘हा’ मोठा आदेश

August 29, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

नागरिकांनो! शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन हवी आहे, तर आजच मंगळवेढा पंचायत समितीकडे करा अर्ज

August 29, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

शॉकिंग! भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन नवऱ्यानेच बायकोला संपवलं; हत्याकांडाने ‘हा’ जिल्हा हादरला

August 29, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आरक्षण घेऊनच जाणार! डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही, तोपर्यंत मुंबई सोडायाची नाही; आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

August 29, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

August 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा