बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने चांगलाच पाय रोवला असून कोरोना काय सांगोलाकरांची पाठ सोडायचे दिसेना आज आणखी 47 नव्या रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 706 वर गेली आहे. तर आज 7 रूग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज दि.4 सप्टेंबर रोजी 60 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 200 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 200 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 41 आणि निगेटिव्ह 159 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरीक हे सांगोला 26 , कोळा 1 , मेडिशिंगी 6 , घेरडी 1 , हंगिरगे 1 , बामणी 1 , एखतपूर 1 , महुद 2 , कमलापूर 1 , यलमार मंगेवाडी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 6 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरिक हे सांगोला शहर 2 , कटफळ 2 , चिकमहूद 2 येथील रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 706 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 363 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत 334 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Sangola The number of victims exceeded seven hundred; An increase of 47 more patients today
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज