बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्याचे माजी आमदार तथा माजी मंत्री व भारतीय कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार तसेच रूरल फाउंडेशनचे प्रदीप लोखंडे यांना पाचवा आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली आहे. Abasaheb Veer Award announced to former MLA Ganapatrao Deshmukh
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारार्थींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती मदन भोसले यांनी दिली.भोसले म्हणाले, कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या 23 वर्षांपासून आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येतो.पुरस्काराचे यंदाचे 24 वे वर्ष आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जीवनाच्या विविध क्षेत्रांत समाजहिताचे कार्य अखंडपणे करीत युवा पिढीला प्रेरक ठरणाऱ्या, तसेच जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान व्हावा, या उद्देशाने आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून, 51 हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या निवडीसाठी करण्यात आलेल्या समितीने यंदाच्या चोविसाव्या पुरस्कारासाठी गणपतराव देशमुख यांच्या नावाची आणि पाचव्या प्रेरणा पुरस्कारासाठी प्रदीप लोखंडे यांची एकमताने शिफारस केली होती. ही शिफारस.संचालक मंडळाच्या बैठकीतही एकमताने स्वीकारण्यात आल्याचेही भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे दोन्ही पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम होणार नसून पुरस्कारार्थीना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज