टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्रीराम फाऊंडेशनच्यावतीने महिलांचे सर्वांगिण सबलीकरण या विषयावर कोल्हापूरचे तज्ञ व्याख्याते संदिप धनंजय पवार हे आज सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंगल कार्यालय शिशुविहार समोर व्याख्यान देणार आहेत.
महिलांचे सर्वांगिण सबलीकरण याविषयावर गेली २७ वर्षे संदिप पवार हे व्याख्यान देत आहेत. व्यवसाय प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास या विषयावर त्यांचा चांगला हातखंडा आहे.
आत्तापर्यंत राज्यात त्यांनी हजारो व्याख्याने दिली असून त्याचा महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे.
महिला स्वत:च्या पायावर स्वत : व्यवसाय करुन सक्षमपणे उभा राहू शकतात हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून शेकडो उदाहरणासह दाखवून दिले आहे.या कार्यक्रमाचे सयोजन श्रीराम फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज