टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ मधील श्री जगदंबा मंदिर देवस्थानास नगरपालिका फंडातून फरशीकरण कामास निधी मंजूर झाला आहे.
या फरशीकरण कामाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.अरुणा सोमनाथ माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.शरद शिर्के,डॉ.प्रीती शिर्के, संजय मोरे, दिलीप बिनवडे, महेश बिनवडे, सोमनाथ माळी, सूर्यकांत बिनवडे, चंद्रकांत चव्हाण, स्वप्नीन टेकाळे, दिगंबर बिनवडे आदीजन उपस्थित होते.
दरम्यान, श्री.जगदंबा मंदिर देवस्थानच्या सभामंडपाचे काँक्रीटकरण काम नगराध्यक्षा सौ.अरुणा माळी व सोमनाथ माळी यांनी स्वखर्चाने करून दिले आहे.
मंदिराच्या फरशीकरण कामास नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक ,नगरसेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज