mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सत्ताधाऱ्यांचा अप्रमाणिकपणा, गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचारी वृत्तीमुळे दामाजी कारखाना मोडकळीस आणला; अजित जगतापांची सडकून टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 7, 2022
in मंगळवेढा, राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स।

कारखान्यास उस घालवताना  शेतकऱ्यांची जी हेळसांड झाली त्यामुळे  शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला . ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले नाहीत, कामगारांच्या पगारी नाहीत,

कारखाना नफ्यात यायच्या ऐवजी तोट्यात गेला आहे. २० कारखान्याएवढा मोठा उद्योग असतानाही पोट न भरलेल्या आ.आवताडे साखर ,भंगारात डल्ला मारला.

शेतकऱ्यांच्या घामातून आलेल्या उसाची खोटी रिकव्हरी दाखवून साखरेची काळ्या बाजारात विक्री करण्याचे पाप केले.

आ.आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या रक्ताचा घोट घेतला आहे त्यांच्या भ्रष्टाचारी व स्वार्थी वृत्तीने दामाजी रसातळाला गेला आहे. असा घणाघात नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी केला.

समविचारी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ खुपसंगी, जुनोनी, गोणेवाडी, लेंडवेचिंचाळे, शिरसी, नंदेश्वर, भोसे, महमदाबाद हु., लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नुर येथे सभा घेण्यात आल्या यामध्ये ते बोलत होते.

यावेळी ऍड नंदकुमार पवार, दामोदर देशमुख,संजय कट्टे,शिवानंद पाटील, प्रकाश गायकवाड, औदुंबर वाडदेकर,शशिकांत बुगडे, भिवा दोलतोडे, तानाजी काकडे, बसवराज पाटील,गौडाप्पा बिराजदार,

आप्पासाहेब चोपडे,तानाजी खरात,कल्याण रोकडे,, दादा गरडे, अशोक चौडे, भारत पाटील, , दादा दोलतोडे, अशोक चौडे ,

शिवाजीराव नागणे,पांडुरंग भाकरे, कांतीलाल ताटे, दौलतराव माने आदी उपस्थित होते.

दक्षिण भागातील मतदारांनी पोटनिवडणुकीत कमी मते दिली म्हणून भोसे पाणीपुरवठा योजना बंद पडण्याचे पाप आ.आवताडे यांनी केले.

सत्ताधाऱ्यांनी सभासद शेतकरी व कामगारांच्या हिताचा खोटा बुरखा पांघरून सहा वर्षे कारभार केला शेतकऱ्यांची कामधेनु असणाऱ्या दामाजी कारखान्यात चेअरमन झाल्यापासून आ.आवताडे यांनी  शेतकरी हिताचे कोणते निर्णय घेतले त्याचा जाहीर खुलासा करावा.

जाहीरनाम्यातील १९ आश्वासने त्यांनी पूर्ण न करता सभासदांची फसवणूक केली. कामगारांचे कारखान्याकडील साडेतीन कोटी रुपये न दिल्याने कामगारांची पतसंस्था बंद पाडली.

यामुळे हजारो कामगार देशोधडीला लागले. १९ हजार ५०० सभासदांना  नोटीसा देऊन वगळण्याचा डाव रचला. २५०० सभासदांना पटापट कमी केले आ.समाधान आवताडे याची दामाजी कारखान्यात हिटलरपेक्षा पेक्षा मोठी हुकूमशाही आहे.

सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापून खाण्याचा उद्योग आवताडे आणि कंपनीने केला आहे. हजारोचा रोजगार व लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या दामाजीला जपायला हवे होते  मात्र त्यांनी कारखान्याचे वाटोळे केले.

सत्ताधाऱ्यांचा अप्रमाणिकपणा, गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचारी वृत्ती या प्रमुख कारणामुळे दामाजी कारखाना मोडकळीस येत आहे याचा फटका सर्वसामान्य शेतकरी, सभासदांना कामगारांना बसत आहे असा आरोप अजित जगताप यांनी केला.

मतदारांनी धडा शिकवावा

काहीही काम नाही केले तरी पैशाच्या जीवावर निवडणूका जिंकता येतात हे खुळ आ.समाधान आवताडे यांच्या डोक्यात आहे. ते खूळ कायमचे काढून टाकण्यासाठी या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा.

पैशाचा उन्माद आसल्याने मतदारांना विकत घेण्याच्या वृत्तीला सभासद धडा शिकवतील .

दामाजी साखर कारखान्यात हुकुमशाही पद्धतीने कारभार चालला असून तो मोडून काढून कारखाना सभासदांच्या मालकीचा होण्यासाठी या निवडणुकीत सत्ताधारी गटाला त्याची जागा दाखवावी असा घणाघात पैलवान अशोक चौंडे यांनी केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगताप

संबंधित बातम्या

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
मंगळवेढा तहसील कार्यालयात आज जिजाऊ-सावित्रींच्या लेकी आणि वीर पत्नींचा सत्कार सोहळा

मंगळवेढेकरांनो! आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्यास ‘या’ मोफत योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडा; महसूल प्रशासनाने केले आवाहन

June 23, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील आमदाराकडून पेपरात अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली

June 23, 2025
मंगळवेढा हादरला! एका विवाहित महिलेवर तीघांचा जबरी अत्याचार; इज्जतेपोटी ‘त्या’ विवाहितेने केली आत्महत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या

संतापजनक! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्…; अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

June 23, 2025
‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

June 22, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

धक्कादायक! सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने उचलले टोकाचे पाऊल, मंगळवेढ्यातील घटना; सून हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती…

June 23, 2025
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

June 22, 2025
नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

June 21, 2025
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

June 16, 2025
Next Post
मोठी बातमी! ‘विठ्ठल’वर अभिजीत पाटील गटाची एकहाती सत्ता; सभासदांनी केला भालके गटाचा सुफडा साप

मोठी बातमी! 'विठ्ठल'वर अभिजीत पाटील गटाची एकहाती सत्ता; सभासदांनी केला भालके गटाचा सुफडा साप

ताज्या बातम्या

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 24, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 24, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
मंगळवेढा तहसील कार्यालयात आज जिजाऊ-सावित्रींच्या लेकी आणि वीर पत्नींचा सत्कार सोहळा

मंगळवेढेकरांनो! आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्यास ‘या’ मोफत योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडा; महसूल प्रशासनाने केले आवाहन

June 23, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..