
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाव्हायरसविरोधात लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना लशीची चाचणी सुरू आहे, अशात आनंदाची बातमी म्हणजे रशियातील कोरोना लशीची (russia corona vaccine) मानवी चाचणी यशस्वी झाली आहे आणि ही लस सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. Russia’s coronavirus vaccine successful
रशियाच्या गेमली इंस्टिट्युट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने (Gamalei Institute of Epidemiology and Microbiology) ही लस तयार केली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने या लशीची चाचणी केली. 18 जून रोजी या लशीचं क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात आलं होतं.
????#Sechenov University has successfully completed tests on volunteers of the world’s first vaccine against #COVID19.
“The #vaccine is safe. The volunteers will be discharged on July 15 and July 20″, chief researcher Elena Smolyarchuk told TASS ➡️ https://t.co/jVrmWbLvwX pic.twitter.com/V8bon4lieR
— Russia in India (@RusEmbIndia) July 12, 2020
इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादिम तारासोव्ह यांनी सांगितलं की, “कोरोनाव्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लशीच्या मानवी चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत”
सेचेनोव्ह विद्यापीठाचे अलेक्झँडर लुकाशेव म्हणाले, “ही लस मानवी शरीरासाठी किती सुरक्षित आहे, हे तपासणं हाच या चाचणीमागचा हेतू होता आणि तो साध्य झाला आहे. मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे. कोरोनाविरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे”
“लशीची चाचणी घेतलेल्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल. तर दुसऱ्या गटाला 20 जुलैला डिस्चार्ज दिला जाईल”, असं वादिम तारासोव्ह यांनी सांगितलं.
रशियातील कोरोनाची लशीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्या यशस्वी झाल्या असून लस सुरक्षित पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती सेचेनोव्ह विद्यापीठाने (Sechenov University ) दिली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर कोरोनाव्हायरसला रोखणारी जगातील ही पहिली लस ठरेल.
दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे. रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.
“करोना व्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत” असे तारासोव्ह यांनी सांगितले. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर करोना व्हायरसला रोखणारी जगातील पहिली लस ठरेल.
सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये करोना रोखणारी लस विकसित करण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे. मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्याससाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले. करोना व्हायरसवर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात १२० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु आहेत.
जगभरात सध्या 12,884,275 कोरोना रुग्ण आहेत, तर 568,561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 7,510,762 कोरोना रुग्ण बरे झालेत. कोरोनाव्हायरसविरोधात लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगभरात 100 पेक्षा अधिक लशींची चाचणी सुरू आहे. यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













