मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
खासगी वाहनावर असलेला बँकेचा बोजा उतरविणे व दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्याकरता सरकारने जारी केलेल्या फॉर्मवर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या बनावट सह्या करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ११ जणावर गुन्हे दाखल झाले आहेत.
या घटनेची हकिकत अशी की, २६ जून ते ४ जुलैच्या दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे वाहन मालक व वाहन मालक
आरोपी मुस्कान नदीम शेख, परमेश्वर गाडीवडार, जावेद मन्सूर पठाण, संजय बाबुलाल मकवाना, योगेश्वर सुरेश दळवे, रफिक अल्लाउद्दीन फुलारी, इराण्णा भुताळी गायकवाड, शैलेशबाबा साहेबलाल भंडारी, रियाज बेलीफ,
रिजवान अय्याज (सर्वजण रा. सोलापूर) यांनी खासगी वाहनावर असलेला बँकेचा कर्ज बोजा उतरण्याकरिता व दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र ( डुप्लिकेट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) मिळविण्याकरिता सरकारने जारी केलेल्या
फॉर्मवर फिर्यादी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शिवराम तिराणकर (रा. अनुदम अपार्टमेंट, विजापूर रोड, सोलापूर) यांची व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे अशा दोघा अधिकाऱ्यांची बनावट सही करून शासनाची फसवणूक केली.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तिराणकर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात ११ जणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानपुडे-पाटील हे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज