टीम मंगळवेढा टाईम्स ।
महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती व पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून अंगावर धावून जाऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सीआयएसएफ जवान नेताजी रमेश आवताडे (२६) व संचिन ज्ञानेश्वर लंगडे (२०) रा.पाठखळ दोघांवर गुन्हा दाखल झाला त्याना ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्याद महीला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती रघुनाथ यादव यांनी दिली.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती यादव व कर्मचारी पो.ना घुले, पोकॉ शिंदे,दरदरे हे सांगोला नाका येथे विनामास्क लोकांवर कारवाई करीत होते.
दरम्यान शनिवारी सव्वा पाचच्या सुमाराला मोटरसायकलवरून (एम एच १३ – डीपी २२३२) वरील दोघानी मला तुम्ही आडविणारे कोण ? असे म्हणून आरेरावीची भाषा वापरली.
कायदेशीर दंड भरा असे सांगितल्यावर पोलिसांच्या अंगावर मारण्याच्या उद्येशाने धावून गेले. तपास सोपनि अमोल बामणे करीत आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न
कर्जबाजारीपणाला कंटाळून गंगाधर रामदास सुहाळ (वय ५२ , रा . दत्तनगर , पाण्याच्या टाकीजवळ) यांनी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोघांना मारहाण सोलापूर, दि.६ सिध्दार्थनगर सोसायटीत राहणाऱ्या शारदा अनिल वाघमारे (वय ४०) व अनिल प्रकाश वाघमारे (वय ४६) यांना योगेश शिंगे व त्याच्या आईने दगडाने मारहाण केली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दुचाकी घसरून जखमी
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथून पाटखळ येथील घराकडे दुचाकीवरून जात असताना गाडी घसरल्याने विजय नाना मेटकरी वय २७ ) हा तरुण जखमी झाला. त्याच्यावर मंगळवेढा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल केले.
विषारी औषध प्राशन
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे राहणाऱ्या लहू बळीराम कोकरे (वय ४०) यांनी अज्ञात कारणावरून बुरशीनाशक विषारी औषध प्राशन केले.
त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वृध्दाची आत्महत्या
सोलापूर शहरातील आकाशवाणी केंद्राजवळील गवळी वस्तीत राहाणाऱ्या सिद्राम बालराजू पामू ( वय ६६ ) यांनी आजाराला कंटाळून वाशाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिसात झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज