टीम मंगळवेढा टाईम्स ।
आयपीएल सामन्यादरम्यान मुंबई विरुद्ध हैदराबाद असा सामना नुकताच झाला. मात्र, कोल्हापुरात रोहित आऊट झाल्यानंतर जल्लोष शर्मा मृत तिबिले करणाऱ्याचा संतप्त झालेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी डोके फोडून जीव घेतला.
बंडोपंत बापूसो तिबिले (रा.हणमंतवाडी) असे मृताचे नाव आहे. मारहाण करणाऱ्या बळवंत झांजगे, सागर झांजगे यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे.
तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायजर्सचा सामना झाला. त्यावेळी चेन्नई टीमचे चाहते असलेल्या बंडोपंत तिबिलेनी आनंद व्यक्त केला आणि आता मुंबई कशी जिंकणार ? असे विचारत जल्लोष केला होता. त्यानंतर बळवंत आणि सागर यांनी त्यांचे डोके फोडले.
यात तिबिले गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या बुधवारी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांसह गल्लीमध्ये एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते.
हल्लेखोर मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत. हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांना चांगलाच राग आला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले त्याठिकाणी पोहोचले.
या वेळी त्यांनी रोहित शर्मा आऊट झाल्याने मुंबई कशी जिंकणार? असे म्हणत आनंद व्यक्त केला. या वेळी रागावलेल्या बळवंत आणि सागर यांनी हल्ला करून तिबिले यांचे डोके फोडले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज