टीम मंगळवेढा टाईम्स।
महाविकास आघाडी आणि आताच्या शिदे फडणवीस सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपद मिळाले नाही. आघाडी आधी वळसे पाटील, त्यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यानंतर बरेच दिवस इंदापूरचे दत्तामामा पालकमंत्री राहिले.
त्यामुळे सोलापूरचे अनेक लोक आपले काम घेऊन इंदापूरला जात होते. त्यानंतर पुढे पुणे मुंबईला जात होते.
आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांकडे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूरकरांना आता वाट बदलावी लागणार आहे.
आता मुंबईला जाण्यासाठी इंदापूरऐवजी अहमदनगरला वळसा घालून जावे लागणार आहे. विखे-पाटलांकडे जबाबदारी आल्याने काँग्रेसमधील जुन्या नेत्यांची चेहरेही फुलले आहे.
कारण, त्यांच्यासोबत काम केल्यामुळे आपलेही कामे आता मार्गी लागतील, अशी कुजबुज ऐकायला मिळत असल्याचे दिसून आले आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज