मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेच्यावतीने २० हजार रक्त पिशवी संकलनाचा संकल्प करण्यात आला असून भारतीय जैन संघटना व मंगळवेढा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री संत दामाजी महाविदयालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जैन संघटना, मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी दिली.
महाराष्ट्रात अवघे दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असून कोरोना व्हायरसच्या भितीने मागील एक महिन्यात कोठेही रक्तदान शिबीर झाले नाही.म्हणून भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी खा.शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेशी चर्चा करून २० एप्रिल पर्यंत २० हजार रक्तपिशव्यांचे संकलन करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.त्यामुळे भारतीय जैन संघटना व मंगळवेढा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस संसर्ग असल्याने एकाच वेळी गर्दी होवू नये यासाठी रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत ९०४९४५६१७९ यावर फोन अथवा एस. एम.एस.व्दारे आपले नाव,गांव व फोन नंबर कळवावा जेणेकरून रक्तदानास येण्याची निश्चित वेळ कळविता येईल तसेच वेळेत रक्तदान शिबीरस्थळी पोहोचून गर्दी होणार नाही असे आवाहन मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील व पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज