टीम मंगळवेढा टाईम्स।
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.
आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलविण्यासाठी अखेर रिझर्व्ह बँकेने मुदतवाढ दिली. शुक्रवारीच याविषयीचे वृत्त येऊन धडकले होते. पण अधिकृत घोषणा झाली नव्हती.
दुपारपर्यंत ही घोषणा न झाल्याने सर्वांनीच आशा सोडली होती. गेल्या वर्षभरापासून गुलाबी नोटा चलनातून गायब आहेत. यावर्षी 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याची घोषणा केली होती.
त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत या गुलाबी नोटा बदलणे अथवा जमा करण्यासाठीची मुदत देण्यात आली होती. आरबीआयच्या आकडेवारीनुसार आता केवळ 7 टक्के नोटा बाजारात आहेत. इतक्या तारखेपर्यंत आरबीआयने मुदत वाढ दिली आहे.
93 टक्के नोटा माघारी
आतापर्यंत 3.32 लाख कोटी रुपये मूल्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा परत बोलाविण्यात आल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने 2 सप्टेंबर रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार, त्यातील 93 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत.
31 जुलैपर्यंत 3.14 लाख कोटी रुपयांच्या 88 टक्के नोटा बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. आरबीआयने 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोट माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. 23 मेपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
अशा बदलवा नोटा
देशातील नागरिकांना या नोटा खात्यात जमा करा अथवा त्या बदलून घ्या. नोट एक्सचेंज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. नागरिकांना सार्वजनिक बँका, व्यावसायिक माध्यम केंद्र आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयात या नोटा बदलवून मिळतील.
एका दिवशी इतक्या नोटा बदला
आरबीआयच्या गाईडलाईननुसार, कोणत्याही व्यक्तीला 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलविता येतील. त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.
एक आठवड्यांची मुदतवाढ
शुक्रवारी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत ही मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता केवळ 7 टक्के नोटा बाजारात आहेत. आरबीआयने नोटा बदलविणे आणि त्या जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागरिकांना आता 7 ऑक्टोबर 2023 रोजीपर्यंत गुलाबी नोटा बदलविता येतील. चुकून एखादी गुलाबी नोट घरात असेल तर लवकरात लवकर ती बदलून घ्या. नाहीतर या नोटा रद्दी होतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज