mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 8, 2020
in सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 28 ग्रामपंचायतींवर सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. आता तहसिलदारस्तरावरून गावनिहाय आरक्षण काढले जाणार आहे.

आरक्षण काढताना सर्वच चिठ्ठ्या समान आकाराच्या असाव्यात, 16 डिसेंबरला 11 वाजता तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी करावे.

कोणत्याही प्रवर्गातील आरक्षण निश्‍चित करताना लगतच्या निवडणुकीतील आरक्षण ध्यानात घेऊन आळीपाळीने आरक्षण द्यावे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश दिले आहेत.

यावेळी आमदार, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यांना निमंत्रित करावे. तसेच सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांनाही निमंत्रित करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मात्र, त्यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीचे तालुकानिहाय अन्‌ सरपंच आरक्षण

मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला व पुरुषांना, 11 महिलांना व 10 पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून संधी मिळेल. तर प्रत्येकी 24 महिला व 24 पुरुषांना सर्वसाधारण प्रवर्गातून संधी मिळणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी दहा ग्रामपंचायतींवर महिला व पुरुषांना संधी मिळणार असून दोन महिला व एका पुरुषास अनुसूचित जमातीतून सरपंच होता येणार आहे. 12 महिलांना व 13 पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंचपदाची संधी मिळेल. तर प्रत्येकी 23 महिला व पुरुषांना सर्वसाधारण प्रवर्गातून संधी मिळेल.

सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला तर सात ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील पुरुषाला, 11 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला तर 10 पुरुषांनाही संधी मिळणार आहे. तर 19 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील महिला तर 20 ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळणार आहे.

करमाळा तालुक्यातील 105 ग्रामपंचातींपैकी 11 ग्रामपंचायतींवर पाच महिला व सहा अुनसूचित जातीचे आरक्षण पडले आहे. तर एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीच्या महिलेला संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातून 28 ग्रामपंचायतींपैकी 14 ग्रामपंचायतींवर महिला तर 14 ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. 65 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारणचे आरक्षण असून त्यात 33 महिलांचा समावेश आहे.

माढा तालुक्यातील 108 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिलांना तर सात ग्रामपंचायतींवर याच प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीचा पुरुष, 14 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांना तर 15 ग्रामपंचायतींवर याच प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळेल. सर्वसाधारण गटातून प्रत्येकी 32 महिला व पुरुषांना संधी मिळणार आहे.

बार्शी तालुक्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला तर सहा पुरुषांना संधी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जमातीतील एका महिलेस संधी मिळणार आहे. 35 ग्रामपंचायतींवर 18 महिला व 17 पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तर 82 ग्रामपंचायतींपैकी सर्वसाधारण गटातील 41 ठिकाणी महिला तर 41 पुरुषांना संधी मिळेल.

उत्तर सोलापूर तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील तीन महिला व तीन पुरुषांना तर अनुसूचित जमातीतील एका पुरुषाला संधी मिळणार आहे. पाच महिला व पाच पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच होण्याची संधी मिळेल. तर 10 महिला व नऊ पुरुषांना सर्वसाधारण गटातून सरपंचपदाची संधी मिळणार आहे.

मोहोळ 94 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिलांना तर सहा ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील पुरुषाला, 13 महिला व 12 पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंचपद मिळेल. 55 पैकी 27 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण गटातून महिलांना तर 28 ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल.

दक्षिण सोलापुरात 83 ग्रामपंचातींपैकी प्रत्येकी सहा ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला व पुरुषांना तर प्रत्येकी दोन महिला व पुरुषांना अनुसूचित जमातीतून सरपंच होता येणार आहे. 11 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातून महिलांना तर 12 पुरुषांना संधी मिळेल. सर्वसाधारण गटातून प्रत्येकी 22 महिला व पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळेल.

अक्कलकोट येथील 117 ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतून महिलांना तर सात पुरुषांना संधी मिळेल. दोन महिला व एका पुरुषास अनुसूचित जमातीतून आणि प्रत्येकी 16 महिला व पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच होता येणार आहे. 34 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातून महिलांना तर 33 पुरुषांना याच प्रवर्गातून सरंपचपद मिळविता येणार आहे.

माळशिरस तालुक्यातील 107 पैकी प्रत्येकी 15 ग्रामपंचायतींवर महिला व पुरुषांना समान संधी मिळणार असून एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील महिलेस तर 14 महिलांना व 15 पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच होता येणार आहे. तर 23 महिलांना व 24 पुरुषांना सर्वसाधारण गटातून सरंपचपदाची संधी मिळणार आहे.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आरक्षणग्रामपंचायतनिवडणूक जाहीरसोलापूर

संबंधित बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
Next Post
काय सांगता! स्मार्टफोनची स्क्रीन व नोटांवर कोरोनाचा विषाणू ‘एवढे’ दिवस जिवंत राहू शकतो

दिलासा! सोलापुरच्या ग्रामीण भागात आज 152 रुग्ण कोरोनामुक्त; 84 पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

ताज्या बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा