टीम मंगळवेढा टाईम्स । गतवर्षी पश्चिम महाराष्ट्रात भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी याबाबत काय काळजी घ्यावी आणि काय उपाय-योजना कराव्यात याचा वडनेरे समितीने अहवाल केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला.
गेल्या वर्षी भीमा आणि कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती संदर्भातील अभ्यासासाठी ही समिती नेमण्यात आली होती. पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी तसंच भविष्यकालीन उपाय योजनांसाठी या अहवालाचा उपयोग होईल, असे या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले.
गेल्या वर्षी भीमा आणि कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती संदर्भातील अभ्यासासाठी ही समिती नेमण्यात आली होती. पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी तसंच भविष्यकालीन उपाय योजनांसाठी या अहवालाचा उपयोग होईल, असे या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले.
– कृष्णा खोऱ्यातील विस्तृत पाणलोट क्षेत्रात अत्यल्प काळात झालेली सातत्यपूर्ण अतितीव्र पर्जन्यवृष्टी
– पूरप्रवण भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती व नदीची रचना.
– पूर प्रवण क्षेत्रात (Flood Zone ) नागरीकरण, बांधकामे, अतिक्रमणे इ. मुळे पूर प्रवाहास अडथळे व नदीपात्राचे झालेले संकुचीकरण.
– शहरी व ग्रामीण भागातील पूरपाणी निचरा व्यवस्थेची खालावलेली परिस्थिती.
– नद्यांमधील नैसर्गिक पूरवहन क्षमतेत झालेली अभूतपूर्व घट.
– नद्यांमधील गाळसाठ्यामुळे उंचावलेले व अरुंद झालेले नदीपात्र.
पूरपरिस्थिती संदर्भातील या विषयीच्या अभ्यासासाठी शासनाने वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. तब्बल २६ बैठका घेत पूरप्रवण भागांना भेटी देऊन तांत्रिक बाबींवर चर्चा करत विविध अंतर्गत अभ्यासगट नेमून सखोल अभ्यास करत हा विस्तृत अहवाल तयार केला आहे.
Report of Wadnere Committee on flood situation in Western Maharashtra submitted to Chief Minister
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज