mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडीसाठी भरती प्रक्रिया सुरू; अर्ज कोठे भेटतो, तो द्यायचा कुठे व शेवटची मुदत किती, जाणून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 12, 2023
in सोलापूर
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांवरील १८६ सेविका व जवळपास ७५० मदतनीस पदांची भरती ३० एप्रिलपर्यंत केली जात आहे.

सांगोला, कोळा, करमाळा तालुक्यातील पदभरतीसाठी दि.२५ मार्चपर्यंत तर सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट येथील पदभरतीसाठी दि.२१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

तसेच उर्वरित तालुक्यातील भरती प्रक्रिया दि.१५ मार्चपासून सुरु होणार असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दि.५ एप्रिलपर्यंत मुदत असणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील भरती ३१ मेपूर्वी उरकली जाणार आहे.

सोलापूर, बार्शी नागरी प्रकल्प आणि सोलापूर-अक्कलकोट नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे यांच्या सोलापुरातील अंत्रोळीकर नगरातील आर्किटेक कॉलेजशेजारील कार्यालयाकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

तर पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यांच्या शहरी भागातील महिला उमेदवारांना पंढरपूर शहरातील बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल.

शहरातील प्रकल्प एकअंतर्गतचे अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांच्या सुपर मार्केटवरील कार्यालयात अर्ज करावे लागतील.

दरम्यान, सोलापूर, पंढरपूर व बार्शी येथील काही शहरी भागाचे अर्ज नागरी प्रकल्प-दोन कार्यालय, रंगभवन ख्रिश्चन हौसिंग सोसायटी येथे अर्ज करावे लागतील. http//solapur.gov.in या संकेतस्थळावर भरतीची संपूर्ण माहिती व अर्ज उपलब्ध आहे.

अर्ज जमा कोठे करायचा?

संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून त्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित शहर किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात मुदतीत तो जमा करायचा आहे.

सोलापूरसह प्रत्येक तालुक्याचा शहरी भाग व ग्रामीण भाग, असे स्वतंत्रपणे अर्ज आहेत. अर्ज करणारा उमेदवार त्या गावातील किंवा परिसरातील स्थानिक रहिवासी असावा, अशी अट आहे.

वयोमर्यादा

भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ असावे. तर विधवा महिला उमेदवारास ४० पर्यंत वयोमर्यादा आहे.

शासनाच्या निर्णयानुसार १०० गुणातून होणार अंतिम निवड

शासनाच्या निर्णयानुसार उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेतील टक्केवारीच्या आधारावर ७५ गुण दिले जातील. तर दुसरीकडे विधवा किंवा अनाथ उमेदवारास दहा गुण, अनुसूचित जाती-जमातीसाठी दहा गुण, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवाराला पाच गुण आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून यापूर्वी कामाचा अनुभव असल्यास पाच गुण मिळणार आहेत. या प्रक्रियेत ज्या उमेदवारास सर्वाधिक गुण, त्याचीच निवड होईल.

मराठीतूनच भरता येईल पोषण ट्रॅकर’ची माहिती

बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना आता ‘पोषण ट्रॅकर’वरील माहिती मराठीतूनच भरण्याची सोय उपलब्ध आहे. मुलाची नोंदणी करताना सुरवातीला आधारकार्डवरून त्याचे नाव इंग्रजीत भरावे लागेल.

त्यानंतर महिन्यातून एकदा मुलांचे वजन, दररोज अंगणवाडी उघडल्याची वेळ, आहार किती दिला, यासंबंधीची माहिती मराठीतूनच भरता येईल. नवीन शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये तर मदतीस महिलेला साडेपाच हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे.

‘पोषण ट्रॅकर’वरील माहिती अचूक भरल्यास सेविकेला ५०० रुपये तर मदतनीस महिलेला २५० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो.(स्रोत:सकाळ)

ADVERTISEMENT

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अंगणवाडी सेविका भरती 2023
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

March 21, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली सोलापूरच्या तरुणाची फसवणूक

March 21, 2023
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी; आणखी एका महिलेचा मृत्यू

March 21, 2023
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

मोठी बातमी! माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तिघांना घेतले ताब्यात

March 20, 2023
नागरिकांनो! न्यायालयात आपली बाजू मांडता यावी यासाठी ‘या’ कार्यालयाकडून गरजूंना मिळणार मोफत वकील

नागरिकांनो! न्यायालयात आपली बाजू मांडता यावी यासाठी ‘या’ कार्यालयाकडून गरजूंना मिळणार मोफत वकील

March 20, 2023
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

पालकांनो! शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार

March 20, 2023
Next Post
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

चुकीला माफी नाही! खोटा चेक देणार्‍यास दोन महिन्यांची शिक्षा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

ताज्या बातम्या

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

March 22, 2023
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

March 22, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना कार्यरत्न पुरस्कार जाहीर

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा