टीम मंगळवेढा टाईम्स ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शौर्याला सलाम’ म्हणून ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला आहे.
याबाबत मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने शिवालयात आयोजित केलेल्या बैठकीत या हलगर्जीपणाला कारणीभूत असणाऱ्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे कामाच्या दर्जावरून आणि या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी केलेल्या घाईवरून आता विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवाची महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे
याबद्दल आम्हाला दुःख होत असून, एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करुन हा पुतळा उभरण्यात आला होता.
४०० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ला आजही मजबूत आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजेत, असे माजी जिल्हा नियोजन सदस्य अजित जगताप म्हणाले.
यावेळी दीपाली जगताप, प्रकाश मुळीक, मदन पाटील, दत्तात्रय भोसले यांनीही निषेध व्यक्त केला. यानंतर तहसीलदारांना संबंधित दोषी लोकांवर कडक कारवाई करावी; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अॅड. राहुल घुले, राहुल सावंजी, संभाजी घुले, रवी जाधव, प्रकाश मुळीक, आनंद मुढे, परमेश्वर पाटील, दत्तात्रय बेदरे, प्रफुल्ल सोमदळे, जमीर इनामदार, प्रदीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे
देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात, तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल, अशी जनतेला खात्री असते; पण मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभराआतच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे.- सतीश दत्तू, अध्यक्ष, वारी परिवार, मंगळवेढा
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज