टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना शासनाने मंजूर केलेले दोन महिन्याचे धान्य मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसील कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले, शहराध्यक्ष हर्षद डोरले, लक्ष्मण गायकवाड, बापूसाहेब कलुबरमे, कैलास कोळी,अर्जुन मुदगुल, संजय मुदगुल, पृथ्वीराज घुले,हरी घुले, अण्णासाहेब माने, चंद्रशेखर राजमाने, गजानन देशमुख, रवी गोवे आदीजन उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले. पहिल्या लाटेत कोरोनापासून काही अंशी दूर असलेला ग्रामीण भाग काहीसा सावरत असताना दुसऱ्या लाटेत पूर्णत: संक्रमित झाला. गावागावात रुग्ण वाढले. अनेकांचा रोजगार थांबला. अशांना दिलासा देत रेशनकार्डधारकांना मोफत धान्य दिले जाणार असल्याची घोषणा सरकारने केली होती.
मात्र मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात आजही अनेक नागरिक सरकारच्या मोफत धान्य योजनेपासून वंचित आहे. मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात केसरी कार्डधारक मजुरांची संख्या अधिक आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे रेशनचे धान्य मिळत नसल्याची माहिती युवराज घुले यांनी दिली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज