टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेतील तब्बल ३ कोटी ८९ लाखांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोलापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
शहा यांनी अटक टाळण्यासाठी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सोलापूर सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंची युक्तिवाद प्रक्रिया पूर्ण झाली होती.

निकाल शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) जाहीर करण्यासाठी राखून ठेवण्यात आला होता. अखेर काल न्यायालयाने शहा यांच्या बाजूने निर्णय देत जामीन मंजूर केला.

या प्रकरणात शहा यांच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ अॅड. शशी कुलकर्णी यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षाच्या वतीने मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी कडाडून विरोध केला.

मूळ फिर्यादीच्या बाजूने अॅड. अभिजीत इटकर यांनी भूमिका सादर केली-सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी सर्वोच्चा न्यायालयातील महत्त्वाचे न्यायनिवाडे सादर करून जोरदार युक्तिवाद केला-तपास अधिकारी एपीआय नितीन अतकरे हेही न्यायालयात उपस्थित होते.

मंगळवेढ्यातील ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी रुपयांचा निधी
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या इमारत उभारणीसाठी १ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या मंजुरीनुसार मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये, लवंगीला २० लाख रुपये महमदाबाद (हु.) ला २५ लाख रुपये कागष्टला २० लाख रुपये, तर पंढरपूर तालुक्यातील कौठाळी ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये असा १ कोटी १७५७लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायती ही स्थानिक – स्वशासनाची प्राथमिक पायरी असल्याने आधुनिक व सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीमुळे ग्रामविकासाच्या प्रक्रियेला बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागात शासकीय सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करण्यासाठी ही तरतूद महत्त्वाची ठरणार असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










