टीम मंगळवेढा टाईम्स । नंदिनी मिल्क प्रॉडक्ट येथील दूध पावडर घेऊन विक्री करणाऱ्या निशांत सिध्दाराम कलशेट्टी (वय २ ९ , रा.सरवदे नगर, मुळेगाव रस्ता) यास पैशाची मागणी व मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वैजिनाथ चनबसप्पा ढंगापुरे ( वय ३० , रा . किसान संकुल , अक्कलकोट रोड ) असे पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपीचे नाव आहे . ढंगापुरे हा फिर्यादीचा व्यवसाय पाहून त्याला माल उचलल्याबद्दल कमिशन दे नाहीतर तुझा व्यवसाय बंद पाडतो अशी धमकी मोबाइलवर देत होता. त्यामुळे फिर्यादी हा त्यास दरमहा १० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करीत होता.
फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटना घडल्यापासून ढंगापुरे हा फरार होता , त्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक करून गुरुवारी न्यायदंडाधिकारी एम.एन. राठोड यांच्यासमोर हजर करून आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
आरोपीस न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे . यात सरकारतर्फे अॅड . आनंद काळे तर आरोपीतर्फे अॅड . सचिन इंगळगी व अॅड . विनयकुमार कटारे यांनी काम पाहिले.
Ransom to a merchant in Solapur; Defendant’s cell
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज