टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातून मराठा आरक्षणासाठी आगळावेगळा लढा उभा केला जात आहे त्या धर्तीवर शिवप्रेमी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आज सायंकाळी ६ वा. रणरागिणी आरक्षणाची मशाल पेटविणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी दिली.
संभाजी महाराजांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढ्यातील समस्त सकल मराठा समाजाने दि.२ जून रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून आरक्षणाच्या या लढ्याची सुरुवात प्रथम मंगळवेढ्यातुन केली होती.
आता मात्र मंगळवेढ्यातील रणरागिनीनी मराठा आरक्षणाच्या या लढ्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी सुरुवातीला जे ५८ मोर्चे काढले होते त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदविला होता.
त्याप्रमाणे मंगळवेढ्यातील प्रत्येक गल्लीतील महिला ही सोलापूरला निघालेल्या मराठा मोर्चामध्ये अतिशय उस्फूर्तपणे व मोठ्या सहभागी झालेल्या होत्या.
आताही मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये मंगळवेढ्यातील रणरागिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या समोर एक मशाल आरक्षणाची पेटवून परत एकदा मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी तयार झालेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर आज दि.५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रतिकात्मक एक मशाल आरक्षणाची पेटवून सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकजूठ करून केंद्र सरकार व राज्य सरकारने मराठा समाजाचे आरक्षण व मागण्या मान्य नाही केल्यास मराठा आरक्षणाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल असा संदेश या मशाली पेटवून देण्याचा प्रयत्न मंगळवेढ्यातील या रणरागिनींचा असेल असे सांगण्यात आले.
या आंदोलनासाठी मंगळवेढ्यातील काही प्रमुख रणरागिनी शिवप्रेमी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आज शनिवार दि.५ जून रोजी सायंकाळी ६ वा. जमा होऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून आरक्षणाची ही मशाल पेटविणार असल्याचे मंगळवेढ्यातील समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज