टीम मंगळवेढा टाईम्स । छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले महाराज यांच्याप्रती असलेल्या प्रेमाने व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सुरु असलेल्या सामाजिक, राजकीय कार्य पाहता तरुणांचा व प्रतिष्ठित नागरिक राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडे येत आहेत.
राजे प्रतिष्ठानच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून छत्रपती मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मरे, नारायण कोळी, महाराष्ट्र चिटणीस चंद्रकांत धडके (मामा) व कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी
व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडीक, अजय येवले व सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य शाखा मंगळवेढा यांचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा सोसायटी सभागृह, मंगळवेढा येथे संपन्न झाला.
यावेळी रमेश दुधाळ,राजाराम डांगे,शहाबुद्दीन मुलाणी, विजयकुमार झिंजुरटे, रमेश भजनावळे,रिझवाना काझी,शिवलिंग राऊत,राजकुमार जाधव,सतिश सावंत सर, राजेश पवार सर यांना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच इंग्लिश स्कूल मंगळवेढा उपप्राचार्य सौ.तेजस्विनी कदम म्याडम यांचे अध्यक्षतेखाली आणि न.पा.पक्षनेते मा.अजित जगताप, नगरसेवक प्रविण खवतोडे, स्वाभिमानी छावा चे संपादक ज्ञानेश्वर भगरे, प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संजय चेळेकर, शिक्षक समिती शाखा मंगळवेढाचे अध्यक्ष विठ्ठल ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगतातून शिक्षकांना शुभेच्छा देवून प्रभावपूर्ण विचार मांडले. प्रास्ताविक राजे प्रतिष्ठानचे जमीर इनामदार यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संभाजी तानगावडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष सुदर्शन ताड आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
Raje Pratishthan Kamgar Sena Maharashtra State Branch Mangalvedha conducts Adarsh Shikshak Puraskar distribution ceremony.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज