टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या मोसमी पाऊसाने अनेक ठिकाणी थैमान घातलं आहे. यावर्षी पूर्वमोसमी आणि मोसमी पावसाने महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान केले तर काही ठिकाणी फायदा झाला.
अनेक शहरांमध्ये या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती तयार झाली होती. अनेक शहरांतील पाणीपुरवठा करणारे तलाव भरलेले आहेत. यावर्षी अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याची चिंता सतावणार नाही, असेही अंदाज मांडले जात आहेत.
(2/n)#WeatherAlert for #Maharashtra: Rain and thundershower with gusty winds over Nanded, #Nashik, Osmanabad, Palghar, Parbhani, #Pune, Raigad, Ratnagiri, Sangli, Satara, Sindhudurg, Solapur, #Thane, Wardha, Washim, Yavatmal districts during the next 4-6 hours. pic.twitter.com/YmclthDUkq
— SkymetWeather (@SkymetWeather) September 9, 2020
स्कायमेट व्हेदरने सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, मुंबई, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही तासात पाऊस होणार आहे.
तसेच नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह येत्या ४-५ तासात पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेट व्हेदरने सांगितला आहे.
Rain will fall in 14 districts including Solapur, Sangli and Satara in next 24 hours
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज