टीम मंगळवेढा टाईम्स।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आता आगामी सत्र परीक्षेचे वेळापत्रक अंतिम केले आहे. बी.ए., बी.एस्सी., बी. कॉम, बीबीए, बीसीए या वर्गाची प्रथम वर्ष सत्र परीक्षा 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
त्यानंतर याच अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा 27 जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. द्वितीय व तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यापीठाने हा बदल केला आहे.
सोलापूर विद्यापीठाने अभियांत्रिकी (बीटेक) व बी-फार्मसीच्या अंतिम वर्षाची परीक्षा 20 जानेकारीपासूनच सुरू केली जाणार आहे. तसेच, बीटेक आणि फार्मसीच्या द्वितीय वर्षाची परीक्षा फेब्रुकारीच्या शेवटच्या आठवडय़ात घेतली जाणार आहे.
अभियांत्रिकीची प्रथम वर्षाची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात (सात दिवसांत) घेतली जाणार आहे. कोरोनानंतर आता ही परीक्षा पहिल्यांदाच वर्णनात्मक प्रश्नपत्रिकांद्वारे घेतली जाणार आहे.
दरम्यान, बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा 20 जानेकारीपासून घेण्याचे नियोजन झाले होते. पण, या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने त्यांची परीक्षा 20 ऐवजी 27 जानेकारीपासून सुरू करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
प्राचार्यांच्या बैठकीनंतर हा बदल करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांकर सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, या संदर्भात विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठविले आहे. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथक, बैठे पथक आणि सरप्राईज पथक नेमली जाणार आहेत.
विद्यापीठाची 20 जानेवारी ते 20 मार्च याकाळात सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर असणार आहे.
दरम्यान, भरारी पथक परीक्षा केंद्रांवर गेल्यानंतर संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी परीक्षा सुरू झाल्यापासून अर्ध्या तासापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज दाखवणे बंधनकारक असेल.
भरारी पथकाने केंद्रावर भेट दिल्यानंतर अर्धा तास अगोदरचे सीसीटीव्ही फुटेज पडताळावे, अशा सूचना विद्यापीठाने पथकातील सदस्यांना केल्या आहेत, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. शिवकुमार गणापूर यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज