पुणे । प्रतिनिधी । पुणे शहरातील बाधित संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी नव्याने 1 हजार 736 बाधित सापडले आहेत. तर 1 हजार 456 बाधित करोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अत्यवस्थ आणि सक्रीय बाधितांची संख्याही वाढली आहे. Pune Saturday added 1,736 new patients; 37 killed
तर दिवसभरात करोनामुळे 37 जणांचा मृत्युची नोंद झालेली आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 2 हजार 468 वर पोहचली आहे.
पुणे शहरात रूग्णवाढीचा वेग वाढला असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. दररोज 35 ते 45 जणांचा मृत्युची नोंद होत असून, हा मृत्युचा कहर रोखण्यात अद्याप प्रशासनाला यश आले नाही. दोन दिवसांत मृतांची संख्या अडीच हजारांचा टप्पा पार करेल, अशी भीती आहे
दरम्यान, शनिवारी दिवसभरात 6 हजार 704 संशयीतांची करोना चाचणी (ऍन्टीजेन आणि स्वॅब) करण्यात आली आहे. तर आतापर्यंत तब्बल 4 लाख 84 हजार 182 जणांच्या चाचणीतून 1 लाख 3 हजार 812 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यातील 85 हजार 371 बाधित ठणठणीत बरे होवून घरी गेले आहेत. तर 15 हजार 973 बाधितांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
मागील आठ दिवसांपासून शहरातील अत्यवस्थ बाधितांची संख्या वाढत असून, आज 910 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 529 जणांना व्हेंटीलेटर लावण्यात आले आहे तर 381 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज