मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राजगुरूनगर येथील एका खासगी क्लासच्या दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने आपल्याच क्लासमधील मुलाचा गळा कापून खून केला.

वाडा रस्त्यावरील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ संस्कार कोचिंग क्लासेसचे वर्ग भरतात.

काल सोमवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिक्षिका गणिताचा क्लास घेत असताना बेंचवर मागे बसलेल्या आरोपी विद्यार्थ्याने वर्गमित्राच्या पोटावर, गळ्यावर धारदार चाकूने वार केले.

गळा खोलवर चिरला गेल्याने खूप रक्तस्त्राव झाला. त्याच अवस्थेत शिक्षिका आणि शेजाऱ्याने विद्यार्थ्याला दवाखान्यात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी विद्यार्थी स्वतःहून पोलिस चौकीत लगेचच हजर झाला.

मृत आणि आरोपी यांच्यात यापूर्वी जुन्या भांडणाचा राग होता. त्यावरूनच त्याचा त्याने खून केला. मृत विद्यार्थी हा राजगुरूनगर येथे शिकत होता तर आरोपी हा मांजरेवाडीतील शाळेत शिकतो. दरम्यान, क्लासच्या शिक्षिका जयश्री गणेश साबळे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडील म्हणाले… मुलास ४ दिवसांपूर्वीही मारहाण
मृत विद्यार्थ्यास ३-४ दिवसांपूर्वी ४-५ मुलांनी मारहाण केली होती. भांडण कशावरुन किंवा काय झाले होते याचे कारण माहिती नसल्याचे मृत विद्यार्थ्यांच्या वडीलांनी सांगितले.

तसेच ३ महिन्यांपूर्वी वाद झाल्याचे सांगितले जाते परंतु मला कल्पना नाही. सकाळी सरकारी दवाखान्यात येण्याचा निरोप मिळाला, मी तिथे गेलो त्याची अवस्था बघवत नव्हती, असे मृत विद्यार्थ्यांचे वडील म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














