सुरज फुगारे । कोरोना रूग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवेढ्यासाठी 108 च्या दोन रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.
गणेशवाडी येथील रुग्णालयास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे खासगी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. या प्रक्रियेतील विलंब झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
याबाबतचे वृत्त ‘मंगळवेढा टाईम्स’ने प्रसिद्ध केले.पक्षनेते अजित जगताप यांनी दोन रुग्णवाहिका देण्यासंदर्भात ची मागणी केली. रत्नागिरी नागपूर या महामार्गाचे काम तालुक्यात सुरू आहे सध्या कोवीड व नाॅन कोवीड रूग्णांचा विचार करता ज्यादा रुग्णवाहिकेची आवश्यकता तालुक्याला आहे.
याबाबत जिल्हा समन्वयक अनिल काळे म्हणाले की,गणेशवाडी येथील रुग्णाला त्रास होत असल्याचा कॉल येण्यापूर्वी त्या ॲम्बुलन्स ला दोन कॉल आले. जिल्ह्यात 108 च्या केवळ 35 रुग्णवाहिका असून या रुग्णवाहिकेने वीस हजार मधील तब्बल 16 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांना उपचारासाठी नेले.
रुग्णांना वेळेवर दाखल करून उपचार झाल्यामुळे बहुतांश रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली. 108 ही रुग्णवाहिकेत सेवा विनामूल्य असल्यामुळे काही गावात किरकोळ त्रास असतानादेखील 108 रुग्णवाहिका चा वापर जनतेकडून होत आहे त्यामुळे पुढच्या ठिकाणी जाण्यास विलंब होत आहे.
आणखी नवीन रुग्णवाहिका देण्याची गरज आहे. मंगळवेढ्यासाठी दोन रुग्णवाहिका देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे.सध्या मंगळवेढा, भोसे या ठिकाणी दोन रुग्णवाहिका असून नव्याने आंधळगाव व मरवडे नवीन रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
Provide two 108 ambulances for mangalwedha: District Planning Board member Ajit Jagtap’s demand
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज