मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्किंग ।
राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीमधील एक घटकपक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदाचा सक्षम उमेदवार आहे. युतीचा धर्म म्हणून विधानसभेला आम्ही केलेल्या मदतीची जाणीव मित्रपक्षाला आहे.

यातून जर आम्हाला डावलले तर आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस लतीफ तांबोळी यांनी सांगितले.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या शक्तिप्रदर्शन करत बैठका झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसची अद्याप बैठक झाली नाही;

या संदर्भात विचारले असता, तांबोळी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी चांगले काम केले. राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद मिळावे, यासाठी भाजपपुढे प्रस्ताव ठेवला आहे.

याशिवाय नगरसेवक पदासाठी सन्मानजनक जागा मिळण्याबाब आम्ही आग्रही आहोत. उद्यापर्यंत भाजपकडून प्रतिसाद न आल्यास अंतिम बैठक घेऊन आम्ही आमचा निर्णय जाहीर करू.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











