mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग : जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ब्रेकिंग : जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात  लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून 31 जुलै 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले. हे आदेश नवीन सुधारीत सूचनेनुसार पोलीस आयुक्तालय हद्द वगळून लागू करण्यात आले आहेत.  Collector Milind Shambharkar Prohibition order in Solapur district till July 31

नवीन सुधारित सुचना खालीलप्रमाणे


65 वर्षे वयावरील व्यक्ती, गंभीर आजारी असलेले रुग्ण, गरोदर स्त्रिया तसेच 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच रहावे. त्यांना अत्यावश्यक कामासाठी व आरोग्यविषयक कारणासाठी निर्देशाचे  पालन करणे आवश्यक राहील. प्रतिबंधीत सांसर्गीक क्षेत्रामध्ये अत्यावश्यक बाबी वगळता निर्बंध कडक राहतील. सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीला अटी/शर्थीनुसार चालू असतील. यामध्ये दुचाकी वाहन (मोटरसायकल) केवळ चालक, तीनचाकी वाहन 1+ 2, चारचाकी वाहन 1+ 2.

जिल्हाअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50% इतक्या मर्यादेपर्यंत आणि सुरक्षित शारिरीक अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून सुरु राहतील.आंतरजिल्हा हालचाल/ये-जा यांचे नियमन केले जाईल.सर्व बिगर अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने/मार्केट ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उघडी राहतील तथापि सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक राहील.

लग्न समारंभाचे आयोजन खुल्या जागा, लॉन्स, विनावातानूकुलीत मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरामध्ये करण्यास या कार्यालयाचे दि.24/06/2020 रोजीचे नमूद आदेशानुसार करण्यास परवानगी असेल.क्रिडा संकूल/स्टेडियमचा बाह्य भाग आणि इतर खुल्या सार्वजनिक जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. प्रेक्षक व सांघिक क्रिडा प्रकार करण्यास परवानगी असणार नाही. बंदिस्त स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या एखाद्या भागात शारिरीक हालचाली अथवा व्यायाम करण्यास परवानगी असणार नाही. सर्व व्यायाम आणि इतर उपक्रम सुरक्षित अंतराचे निकष पाळून करावेत.

वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण (घरपोच वितरण) यांना परवानगी आहे.शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/ महाविद्यालये/शाळा) यांची कार्यालये/कर्मचारी केवळ ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करण्यासह शिक्षणाव्यतिरिक्त (नॉन टीचिंग) उद्देशाने कामकाज करण्यास परवानगी आहे.राज्य शासनाने ज्या केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना परवानगी दिलेली आहे. त्यांना यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीवर चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.यापूर्वी देण्यात आलेल्या विशिष्ट/ सामान्य  आदेशानुसार परवानगी व मान्यता देण्यात आलेले उपक्रम चालू राहतील.

सर्व सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी व प्रवासामध्ये चेहऱ्यावर मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक आहे.सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी  एकमेकांमध्ये किमान सहा फूट (2 गज की दूरी) अंतर ठेवावे.दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर असल्याची खात्री करावी. तसेच पाचपेक्षा अधिक ग्राहकांना एकावेळी दुकानात येण्यास परवानगी देऊ नये.

मोठया सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल. विवाहस्थळी जास्तीत जास्त 50 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी आहे. अंतयात्रा/ अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जास्तीत जास्त 50 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी असेल.सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असेल. थुंकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा व तंबाखू सेवनास कडक निर्बंध असतील. जास्तीत जास्त आस्थापनांनी कर्मचाऱ्याकडून घरातून काम करुन घ्यावे. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, मार्केट, तसेच औद्योगिक व वाणिज्यीक आस्थापनामध्ये कामाच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे.

कामाच्या प्रवेशाच्या ठिकाणी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग, हॅन्डवॉश, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा.कामाचे ठिकाण व शिफ्ट  बदलताना कर्मचारी यांच्यासाठी असणाऱ्या एकत्र सुविधांचे ठिकाणी व सर्व मानवी संपर्क येण्याच्या ठिकाणी दरवाजे, हॅन्डल, वारंवार स्वच्छ व सॅनिटाईझ करण्यात यावे.कामाच्या ठिकाणी कामगारांमध्ये योग्य ते सुरक्षित अंतर असेल तसेच शिफटदरम्यान पुरेसे वेळेचे व सुरक्षित अंतर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भोजन कालावधीमध्ये शिथिलता ठेवावी.

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
खबरदार ! दुकानात साठ वर्षांपुढील व्यक्ती दिसल्यास दुकान होणार सील, ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

खबरदार ! दुकानात साठ वर्षांपुढील व्यक्ती दिसल्यास दुकान होणार सील, 'या' जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा