मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात बायोगॅस व सीएनजीचे उत्पादन सुरू झाले असल्याचे कारखान्याचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी माहीती दिली.
धाराशिव साखर कारखाना नेहमी चर्चेत आणि नवनवीन उपक्रम राबवून सामाजिक कार्यात पुढाकार घेणारा कारखाना म्हणून ओळख आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये इथेनॉल प्लांट बंद करून देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प याच धाराशिव साखर कारखान्यामध्ये यशस्वी झाला होता आणि आता काळाची गरज ओळखून बायो-सीएनजी गॅसचे उत्पादन कारखाना प्रशासन घेत आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धाराशिव कारखान्यात डिसलेरी प्रकल्पातू स्पेंट वॉश पासून बायोगॅसची निर्मिती होत आहे.एका दिवसाला बायोगॅस जवळपास 20हजार m³ उत्पादन घेऊन सीएनजी जवळपास 10 मॅट्रिक टनाचा प्लांट सुरू करण्यात आला आहे.
बाॅयलरला बायोगॅस दिल्याने बगॅसची बचत होत आहे. त्यातूनच पुरक प्रदुषण मुक्त वातावरण निर्माण होत असल्याचे असे श्री.अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले.
यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, शिवसेनेचे नेते आतिश पाटील, पंढरपूर बार असोशिएशन अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, कारखान्याचे जनरल मॅनेजर आयुबखान पठाण,
इंजनिअर देशमुख, प्रविण बोबडे, बाबासाहेब वाडेकर, पेठे, दयानंद गव्हाणे, डिसलेरी मॅनेजर ज्ञानेश्वर कोळगे यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज