टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती.
त्यावेळी त्यांना देहूत येण्याचं आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारलं असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत, अशी माहिती आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असेल असे आचार्य तुषार भोसले यांनी टि्वटमध्ये लिहिले आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्री क्षेत्र देहूत येणार आहेत. असेही त्यांनी लिहिले आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी 14 जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.
महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण
इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत.
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण !॥ जय जय रामकृष्णहरि ॥ pic.twitter.com/iMLiCNWdPv
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) May 22, 2022
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर दौरा
ऐन वारीच्या तोंडावर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा असेल. राज्यात आगामी काळात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या दौऱ्याला महत्त्व असणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी थेट पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचतील.
वारीचा सोहळा 20 जूनपासून
पंतप्रधान मोदी 14 जूनला देहूत येणार आहेत, आणि यंदाचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 20 जूनपासून सुरु होईल. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे होऊ न शकलेला वारीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान देहूत येत असल्याने या दौऱ्याचे विशेष महत्त्व असेल.(TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज