टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे पहिले कल समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली असून सुरुवातीच्या मतमोजणीत धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या फेरीतील मतमोजणीत पिछाडीवर आहेत.
मोदींविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली असून अजय राय यांनी 5 हजार मतांची आघाडी घेतली आहे. अजय राय यांना पहिल्या फेरीअखेर ११ हजार ४८० मते मिळाली आहेत. तर नरेंद्र मोदी यांना ५ हजार २५७ मते मिळाली आहेत.
लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपने यावेळी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे.
पण एक्झिट पोलमध्ये एनडीएला 350 ते 380 पर्यंत जागांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजप खरंच 400 पार करेल का हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसने विरोधी पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे काँग्रेस यावेळी मोदींचा रथ रोखणार का, लोक इंडिया आघाडीला स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(News 18 लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज